महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना इफेक्ट : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज चालणार फक्त 2 तास - न्यायिक कामकाज वेळेत बदल

संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणू पसरत आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानीत देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.

mumbai high court
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज चालणार फक्त 2 तास

By

Published : Mar 17, 2020, 1:14 PM IST

मुंबई - कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यालाच अनुसरून मुंबई उच्च न्यायालयात येणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या अगोदरच तातडीच्या याचिकांवर सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने जाहीर केले होते. यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठासमोर केवळ दिवसातून दोन तास सुनावणी होणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज चालणार फक्त 2 तास...

हेही वाचा...कोरोना इफेक्ट : नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील न्यायिक कामकाजाच्या वेळेत बदल

मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर, औरंगाबाद, गोवा खंडपीठासाठी देखील हे आदेश लागू करण्यात आलेले आहे. त्याबरोबरच सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालयात सुद्धा दिवसभरातून केवळ दोन तास सुनावणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सकाळी 11:30 ते दुपारी 2 व दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत ही सुनावणी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details