मुंबई - देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. मात्र, सलग चार दिवसांच्या रुग्णवाढीनंतर कोराना रुग्ण वाढ घटली असून मागच्या २४ तासांत राज्यात १६ हजार ४२९ नवीन रुग्णांची नोंद झाली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात कोरोना वाढीचा दर घटला: सोमवरी १६ हजार ४२९ नव्या रुग्णांची नोंद
मागील ४ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ सोमवरी क्षमली आहे. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने दिलासा असल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ लाख २३ हजार ६४१ झाली आहे. राज्यात २ लाख ३६ हजार ९३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज राज्यात ४२३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मृतांची संख्या २७ हजार २७ वर पोहोचली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.९३ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात सोमवारी १४ हजार ९२२ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख ५९ हजार ३२२ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३८ टक्के आहे. तर सोमवारी १६ हजार ४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख १० हजार ९७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
हेही वाचा -पुण्यात रुग्णवाहिका मिळत नसल्याने मनसे नगरसेवकाने फोडली उपायुक्तांची गाडी