मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत चालला आहे. परदेशातून आलेले कोरोनाबाधित यांच्याबरोबर आता परदेशात न गेलेल्या लोकांच्याही चाचण्या पॉझिटीव्ह येत आहेत. कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने अशा प्रकारे कोरोनाचा देशात आणि राज्यात प्रसार होत शकतो. त्यामुळे वाढती कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर काळजी घेणे गरजेचे आहे. असे असतानाही देशातील जनता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याचे दिसत आहे. राज्यातही काही विशेष परिस्थिती असल्याचे दिसत नाही. लॉकडाऊन आणि संचारबंदीतही लोक रस्त्यावर अनावश्यक गर्दी करताना दिसत आहेत.
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सुमारे साडेसातशेच्या पार गेली आहे. तर देशातही 4 हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 45 तर देशात एकूण 109 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच हजारोंच्या संख्येने लोकांना रुग्णालये अथवा स्वतःच्या घरात क्वारंटाईन केले आहे.
हेही वाचा...कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समुदाय सहभाग महत्वाचा
कोरोना विषाणू ही जागतिक महामारी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर करण्यात आले आहे. चीन, इटली, स्पेन, अमेरिका, फ्रान्स यांसारख्या बड्या राष्ट्रांत कोरोनाने धुमाकुळ घातला. त्यामुळे भारत सरकार आणि विविध राज्य सरकारे यांनी वेळीच सर्व पाऊले उचलली. कोरोनाला रोखण्यासाठी हर एक उपाययोजना केल्या. नागरिकांना सातत्याने सुचना आणि प्रशासकीय नियोजन केले. जमावबंदी, संचारबंदी अखेरीस 21 दिवसांचा लॉकडाऊन देखील करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचा देशात शिरकाव झाला आणि वेगाने आता तो देशभर पसरत आहे. देशात जे एकूण कोरोनाग्रस्त आहेत त्यात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. यामुळे महाराष्ट्र शासनाकडून सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत. मात्र, असे असतानाही एकूण जनतेला किंवा नागरिकांच्या काही गटला अजून या महामारीचे गांभीर्य समजल्याचे दिसत नाही.
कोरोना हा विषाणू आहे. त्याची वैशिष्ट्ये पाहता इतर कोणत्याही विषाणूपेक्षा तो सर्वाधिक घातक ठरतो आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात लढण्यासाठी शासनाप्रमाणेच जनतेची देखील प्रामाणिक साथ असने आवश्यक आहे. जनतेच्या एका गटाने किंवा काही घटकाने जर याबाबत समंजसपणा दाखलवला नाही, तर त्याचा तोटा हा मात्र सर्वांनाच होणार आहे. त्यामुळे अपवादात्मक लोकांच्या चुकीच्या वागण्याचे तोटे सर्वांच्याच वाट्याला येऊ शकतात. कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव पाहता लोकांना मात्र अद्याप ही बाब समजून आलेली दिसत नाही. यामुळेच लॉकडाऊन, संचार बंदी आणि जमावबंदीचे राज्यात सर्वच ठिकाणी उल्लंघन होताना दिसत आहे. तसेच पंतप्रधानांच्या सोशल डिस्टिन्सिंग या आवाहनाला देखील लोक हरताळ फासत असल्याचे दिसत आहे.
पुढील काही उदाहरणे ही लोकांना कोरोनाचे गांभीर्य न समजल्याचेच द्योतक मानाले लागेल...