मुंबई - सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 21 मार्च ते 31 मार्च दरम्यान मद्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.यादरम्यान मद्य मिळणार नसल्याच्या भीतीने मद्यपीने साकीनाका येथील एका मद्य दुकानाबाहेर मोठी रांग लावली होती. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पालिका राज्यशासन अनेक निर्णय घेता आहेत .
CORONA : 'लॉक डाऊन'मुळे मद्यपींची तारांबळ...दारू मिळवण्यासाठी अनेक उठाठेवी
मुंबईत कोरोना विषाणूचा विळखा हळूहळू वाढत आहे.सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 21 मार्च ते 31 मार्च दरम्यान मद्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.यादरम्यान मद्य मिळणार नसल्याच्या भीतीने मद्यपीने सकिनाका येथील एका मद्य दुकाना बाहेर मोठी रांग लावली होती.
आज रात्रीपासून अत्यावश्यक सेवा व अन्नधान्याचे दुकान सोडून सर्वत्र बंद दुकान करण्यात येणार असल्याने मद्यपी लोकांनी सायंकाळपासूनच मद्य दुकानासमोर १० ते ११ दिवस पुरेल इतका मद्यसाठा जमा करण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे अचानक तळीरामांची साकीनाका येथील साईनाथ मद्य विक्री दुकानात गर्दी वाढली. नागरिकांना प्रशासनाकडून विषाणूचा प्रसार होणार नाही याकरिता गर्दी करू नये, असे आव्हान करूनही नागरिक प्रतिसाद देत नसल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याने अनेक कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत.