महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण Live : 'मनिष भानुशालीने मारहाण केली, नवाब मलिकांना भेटलो नाही'; सुनील पाटील यांचा गौप्यस्फोट - मनिष भानुशाली

cordelia cruise drugs case live updates
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण Live : 'मनिष भानुशालीने मारहाण केली, नवाब मलिकांना भेटलो नाही'; सुनील पाटील यांचा गौप्यस्फोट

By

Published : Nov 8, 2021, 8:31 AM IST

Updated : Nov 8, 2021, 12:53 PM IST

12:31 November 08

मंत्री असल्यामुळे मला अनेक कार्यक्रमांना आणि पार्ट्यांना आमंत्रित केले जाते. मला एका काशिफ खान नावाच्या व्यक्तीने क्रूझ पार्टीला आमंत्रित केले होते. मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखत नाही आणि माझ्याकडे त्याचा संपर्क क्रमांक देखील नाही, असे महाराष्ट्राचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

12:31 November 08

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि प्रभाकर साईल यांच्या भेटीच्या ठिकाणी NCB अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

NCB अधिकाऱ्यांकडून ठिकाणांची पाहणी

07:59 November 08

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण Live : 'मनिष भानुशालीने मारहाण केली, नवाब मलिकांना भेटलो नाही'; सुनील पाटील यांचा गौप्यस्फोट

मुंबई -  आर्यन खान प्रकरणात नवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत.  सुनील पाटील नावाची व्यक्ती या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं होतं. आता सुनील पाटील यांनी मुंबई पोलिसांकडे जाऊन आपली बाजू मांडली. पोलिसांनी सुनील पाटील यांचा जाब नोंदवला आहे. राष्ट्रवादीशी आपला संबंध नसून आर्यन खान प्रकरणात आपल्याला फसवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुनील पाटील यांनी राष्ट्रवादी संबंधावर स्पष्टीकरण दिले असून भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.  

मनिष भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा हेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा सुनील पाटील यांनी केला आहे. मनिष आणि धवल भानुशाली यांनी मला मला जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असा धक्कादायक आरोप सुनील पाटील यांनी केला आहे.  

आर्यन खान केस प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. मी फक्त यामध्ये 50 लाखाची डील केली होती. नंतर ती डील कॅन्सल झाल्याचं सॅम डिसुझाने सांगितलं. डील कॅन्सल झाल्यानंतर मी त्यांना पैसे परत देण्यास सांगितले होते. पैसे कुठे आहेत हे मला माहिती नाही, असे सुनील पाटील यांनी सांगितलं.

माझा आर्यन खान प्रकरणाशी संबंध नाही. माझा मनीष भानुशालीसोबत संपर्क आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो कारण तो माझा मित्र आहे. आर्यन प्रकरणाची मला कुठलीही टीप मिळाली नाही. ही टीप मनीष भानुशाली, निरज यादवला मिळाली. नीरज यादव हा मध्य प्रदेशातील भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यांनी मला ही माहिती एनसीबीला देण्यास सांगितले होते. त्यावर माझं हे काम नाही, मी हे काम करत नाही. तुमचं तुम्ही बघून घ्या, मी त्यांना म्हटलं.  

माझा संपर्क एनसीबीशी नव्हता. तर माझा एक सॅम डिसूझा मित्र होता. सॅम डिसूझाचा एका वर्षापूर्वी एनसीबीशी संपर्क आला होता. ड्रग्ज प्रकरणात चार महिन्यांपूर्वी एनसीबीनं समन्स पाठवलं होतं. प्रकरण मिटवण्यासाठी एनसीबीवाल्यांना पैसे देण्यासाठी सॅमने माझ्याकडे मदत मागितली होती. माझ्याकडे पैसे कमी आहेत पाच ते दहा लाखांची मदत कर. एकूण किती पैसे द्यायचे असं मी विचारलं तर तो म्हणाल 25 लाख रुपये द्यायचे आहेत. मी म्हटलं ठीक आहे सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. यानंतर त्यानं पुन्हा दुसऱ्यांदा फोन केला आणि म्हणाला तुम्ही मला पैसे दिले नाहीत तर माझं काम होणार नाही का? मी एनसीबीवाल्यांना पैसे दिले आणि आता सुटलो आहे, असे त्याने मला फोन करून सांगितले होते. तेव्हा सॅमचा एनसबीशी संबंध आल्याचे मला माहित होते. तेव्हा मग मी किरण गोसावी आणि मनीष भानुशाली यांचा सॅमशी संपर्क करून दिला. तुम्ही त्याच्यामार्गे एनसीबीपर्यंत जाऊ शकता, असे मी मनीष भानुशाली यांना सांगितलं. एवढीच माझी भुमिका होती, असे सुनील पाटील यांनी सांगितलं.  

आर्यनला सोडण्यासाठी पुजाकडे 50 लाख मागितले. याबद्दल मला सकाळी साडेआठ वाजता सांगण्यात आलं. प्रभाकरने पुजाकडून पैसे घेतले. यानंतर मला गोवावीने मला पैसे कुठे ठेऊ, याबाबत विचारणा केली.  पुन्हा रात्री 11 वाजता या मयुरचा मला फोन आला की, सॅमनं सांगितलं की, काम झालेलं नाही पैसे परत द्या. त्यावर मी केपी गोसावीला शिव्या घातल्या. तू पैसे दिले आहेत तर त्यांना परत करं, असे मी त्यांना सांगितलं.  हे पैसे त्यानं कुठे ठेवलेत माहिती नाही. या व्यतिरिक्त मला काहीही माहिती नाही. यांच्यामध्ये डील कधी झाली? कितीची झाली? याची मला माहिती नाही, असंही सुनील पाटील यांनी सांगितले.  

नवाब मलिकांना भेटलो नाही -

नवाब मलिक यांच्याशी मी कधीच भेटलो नाही. तसेच मी कधीच सह्याद्री अतिथिगृहात गेलो नाही. हवे असल्यास सीसीटीव्ही फूटेज तपासून घ्या. फक्त 10ऑक्टोबर रोजी माझं नवाब मलिकांशी बोलणं झालं होतं.  माझी भीती मी त्यांच्याजवळ व्यक्त केली होती. ऋषिकेश देशमुखशी माझा संबंध नाही. तसेच वळसे पाटलांना मी कधीच भेटलो नाही. तर अनिल देशमुख कोरोनाकाळात एकदा धुळ्यात आले होते. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्याशी कधी भेट झाली नाही, असे सुनील पाटील यांनी सांगितले.  

मोहित भारतीय सुनील पाटील यांच्यावर आरोप?

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोप-प्रत्यारोप प्रकरणानंतर आता हालचालींना वेग आला आहे. भाजपाचे नेते मोहित भारतीय यांनी सुनील पाटील याचा उल्लेख केला होता. सुनील पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहे आणि ते खरे या प्रकरणाचे मास्टरमाइंड आहे, असा आरोप भाजपा नेते मोहित भारतीय यांनी केला होता.  मोहित भारतीय यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सुनील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे काय संबंध आहे यासंदर्भात व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप जारी करून माहिती दिली होती.  

Last Updated : Nov 8, 2021, 12:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details