मुंबई - मनसेच पहिले महाअधिवेशन मुंबईतील गोरेगाव नेस्को येथे 23 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिली. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून त्या दिवशी हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेणारी मनसे नेत्यांची बैठक, शुक्रवारी मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगड कार्यालयात पार पडली.
हेही वाचा... 'कावळ्याच्या शापाने काही गुरं मरत नाहीत'
मनसेच्या महाअधिवेशला मोठ्या प्रमाणात राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हे अधिवेशन कसे असावे, अधिवेशनात कोणते मुद्दे चर्चेला असावेत, यासाठी मनसेच्या बैठका सुरू आहेत. त्याच अनुशंगाने शुक्रवारी मनसेच्या पदाधिकाऱयांची बैठक राजगड येथील मुख्यालयात पार पडली असल्याची माहिती मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिली.