मुंबई - मुंबईत गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट आटोक्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी चारशेहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 18 ऑगस्टला 2058 दिवस होता तो 600 दिवसांनी घसरून शुक्रवारी 1416 इतका नोंदवण्यात आला आहे. यामुळे मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा होऊ लागल्याचे दिसत आहे.
मुंबई कोरोना अपडेट : सलग तिसऱ्या दिवशी चारशेहुन अधिक रुग्णांची नोंद
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 45 हजार 434 वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा 15 हजार 987 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 7 लाख 23 हजार 458 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 3 हजार 532 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 1416 दिवस इतका आहे.
रुग्णसंख्येत वाढ -
मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. त्यात जुलै ऑगस्ट महिन्यात घट झाली आहे. 16 ऑगस्टला सर्वात कमी 190 रुग्णांची नोंद झाली. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊन दिवसाला 300 रुग्ण आढळून येत होते. 31 ऑगस्टला 323 रुग्ण आढळून आले होते. सप्टेंबर महिन्यात त्यात वाढ होऊन 1 सप्टेंबरला 416, 2 सप्टेंबरला 441, 3 सप्टेंबर 422 रुग्ण आढळून आले आहेत.
आतापर्यंतची रुग्णसंख्या -
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 45 हजार 434 वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा 15 हजार 987 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 7 लाख 23 हजार 458 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 3 हजार 532 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 1416 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या एकही चाळ आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या नाहीत. तर रुग्ण आढळून आल्याने 43 इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी एकूण 93 लाख 53 हजार 296 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रुग्णसंख्येत चढउतार -
4 एप्रिलला 11,163, 7 एप्रिलला 10428, 1 मे रोजी 3908, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 17 मे ला 1240, 25 मे ला 1037, 28 मे ला 929, 14 जून ला 529, 16 जून ला 830, 21 जून ला 521, 22 जून ला 570, 4 जुलै ला 548, 5 जुलै ला 489, 6 जुलैला 453, 13 जुलैला 441, 2 ऑगस्टला 259, 9 ऑगस्टला 208, 16 ऑगस्टला 190, 1 सप्टेंबरला 416, 2 सप्टेंबरला 441, 3 सप्टेंबर 422 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यावर्षी 1 फेब्रुवारीला 328, 2 फेब्रुवारीला 334 तर 26 जुलैला 299, 16 ऑगस्टला 190 सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे.