मुंबई- मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा रुग्णसंख्या आटोक्यात आली. मात्र, आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 16 नोव्हेंबरला रुग्णसंख्या 409 पर्यंत खाली आली होती. गेल्या आठवडाभरात त्यात दुप्पटीहून अधिक वाढ झाली. आज सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आज नव्या 1135 रुग्णांची नोंद झाली असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे हजाराहून अधिक रुग्ण; 19 रुग्णांचा मृत्यू - मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा
मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 1135 नवे रुग्ण आढळून आले असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 18 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 12 पुरुष तर 7 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 75 हजार 707 वर पोहचला आहे.
मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 1135 नवे रुग्ण आढळून आले असून 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 18 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 12 पुरुष तर 7 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 75 हजार 707 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 673 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 618 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 52 हजार 127 वर गेला आहे. सध्या मुंबईत 9 हजार 770 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 258 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 258, दिवस तर सरासरी दर 0.27 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 365 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 4 हजार 168 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 17 लाख 73 हजार 989 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या
१६ नोव्हेंबर - ४०९
१७ नोव्हेंबर - ५४१
१८ नोव्हेंबर - ८७१
१९ नोव्हेंबर - ९२४
२० नोव्हेंबर - १०३१
२१ नोव्हेंबर - १०९२
२२ नोव्हेंबर - ११३५
कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -
7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण
14 नोव्हेंबर 574 रुग्ण
16 नोव्हेंबर 409 रुग्ण