महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत मान्सूनची सलग तिसऱ्या दिवशी दमदार बॅटिंग, कोस्ट गार्ड अलर्टवर - मुंबई पाऊस रेड अलर्ट बातमी

आज रविवारीही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.

continues rain in mumbai
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी

By

Published : Jul 5, 2020, 10:52 AM IST

Updated : Jul 5, 2020, 11:30 AM IST

मुंबई - हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत शुक्रवार सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक वळवण्यात आली होती. दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने मुंबई महापालिकेने अग्निशमन दल, एनडीआरएफ, नौसेना, कोस्ट गार्ड आदी यंत्रणांना सज्ज ठेवले आहे.

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी

मुंबईत शुक्रवार पासून पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार शुक्रवारी महानगरात जोरदार पाऊस पडला. 3 ते 4 जुलै या 24 तासात कुलाबा येथे 169 तर सांताक्रूझ येथे 157 मिलिमीटर पावासाची नोंद झाली होती. याच दरम्यान शहर विभागात 101.81, पूर्व उपनगरात 84.25, पश्चिम उपनगरात 94.78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. शनिवारीही पाऊस जोरदार बरसल्याने गेल्या 24 तासात कुलाबा येथे 129.6 तर सांताक्रूझ येथे 200.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज रविवारीही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने मुंबई महापालिकेने अग्निशमन दल, एनडीआरएफ, नौसेना, कोस्ट गार्ड आदी यंत्रणांना सज्ज ठेवले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.

शुक्रवारी या विभागात साचले पाणी -


भुलाभाई देसाई मार्ग, बिंदू माधव जंक्शन, वरळी नाका, हिंदमाता जंक्शन, धोबीघाट कफ परेड चिराबाजार, पोलीस आयुक्त कार्यालय, भायखळा पोलीस स्टेशन, सायन रोड नंबर 24, गांधी मार्केट, अंधेरी, मालाड आदी ठिकाणी पाणी साचले.

शनिवारी या विभागात साचले पाणी -


हिंदमाता, शक्कर पंचायत रोड वडाळा, धारावी क्रॉस रोड, सरदार हॉटेल काळाचौकी, एसआयइएस कॉलेज माटुंगा, भायखळा पोलीस ठाणे, चेंबूर ब्रिज, चेंबूर रेल्वे स्टेशन, अंधेरी सबवे, नॅशनल कॉलेज बांद्रा.

Last Updated : Jul 5, 2020, 11:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details