मुंबई- दिवाळी सुरू झाली आहेत सगळीकडे खरेदीची लगबग दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आहे. नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी हळूहळू बाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनीही आपली दुकाने सजवली आहेत. चायनीज वस्तूंवर असलेली बंदी यामुळे बाजारपेठांमध्ये देशी वस्तूंना मोठी मागणी आहे. पणती, आकाश कंदील, फटाके, रांगोळी, कपड्यांचे दुकान यांचे स्टॉल उभारलेले पाहायला मिळतात. परंतु असे असले तरीही यावेळी महागाई मोठ्या प्रमाणात आहे यामुळे नागरिक येतात. मात्र दर जास्त असल्यामुळे नफा कमी होतो असे विक्रेत्यांनी सांगितले.
ग्राहकांचे चायनीज वस्तूंवरील आकर्षण कमी चायनीज वस्तूंचे आकर्षण कमी -
चीन आणि भारतातील झालेल्या संघर्षानंतर चायनीज मालावरती बंदी घालण्यात आली. चायनीज मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम देशभरात सुरू आहे. यामुळे यावेळी माल बाजारपेठा दिसत आहे. मात्र चायनीज वस्तू या आकर्षित आकर्षक असतात. यामुळे ग्राहकांचा याकडे ओढा असतो. मात्र यंदा चायनीस वस्तू बाजारपेठेत नाही आहे. देशी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत मात्र त्याचे दर जास्त असल्यामुळे ग्राहक जास्त येत नाहीत आणि यामुळे कमी दरात वस्तू विकाव्या लागत असल्यामुळे नफा जास्त होत नाही, असे विक्रेते सुरेंद्र पाल यांनी सांगितले.
अनेकप्रकारचे लाईट्स उपलब्ध -
काही वर्षांपूर्वीपर्यंत छोटे इलेक्ट्रिशियन्सच दिव्यांची माळ तयार करून ते विकत होते. पण त्यानंतर दहा वर्षांपासून चायजीन दिवे आले. या चायनीज दिव्यांच्या माळेला मागील चार-पाच वर्षांपासून जोरदार मागणी आहे. या मागणीमुळे देशी पारंपरिक माळा तयार करणाऱ्यांचा व्यवसायच बुडाला. आता सध्या भारत-पाकिस्तान यांच्यातील कटू संबंधांमुळे पाकिस्तानला मदत करणाऱ्या चिनी मालाविरुद्ध सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जात आहे. तसे असले तरी बाजारात मात्र ग्राहकांचा कल पूर्णपणे चायनीजकडे आहे. दिवाळी आली की सर्वात आधी आठवण येते रोशणाईची. यासाठी जवळपास ४० प्रकारच्या लाइट्स आणि दिव्यांच्या माळा तसेच अन्य सामग्री बाजारात डेरेदाखल होऊ लागली आहे.