महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंदीत सिमेंटच्या किंमती वाढल्या, कंपन्यांच्या मनमानीविरोधात 'बीएआय' न्यायालयात जाणार - बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया

कोरोनाच्या काळात सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या किंमतीत प्रति गोणी 100 ते 150 रुपयांची वाढ केल्याने या क्षेत्राच्या अडचणी आणखी वाढवल्या आहेत.

सिमेंट
सिमेंट

By

Published : May 16, 2020, 8:30 PM IST

मुंबई - बांधकाम व्यवसाय सध्या लॉकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या किमतीत प्रति गोणी 100 ते 150 रुपयांची वाढ केल्याने या क्षेत्राच्या अडचणी आणखी वाढवल्या आहेत. मागणीत कोणतीही वाढ झालेली नसताना कंपन्यांनी मनमानीपणे दरवाढ केल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी आता 'बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया'ने केली आहे.

मुंबईसह इतर महानगरांमध्ये मोठ्या संख्येने बांधकामे सुरू आहेत. बांधकामातील सर्वात महत्त्वाचा घटक हा सिमेंट आहे. त्यामुळे सिमेंटची मागणी नेहमीच मोठी असते. पण, त्याचवेळी भारतात 13 कंपन्यांची मक्तेदारी आहे. त्यामुळे या कंपन्या नेहमीच सिमेंटच्या किमतीत कृत्रिम दरवाढ करत असतात.

एप्रिलमध्ये अंदाजे 225 ते 275 रुपये प्रति गोणी (50 किलो) असे दर सिमेंटचे होते. तेच दर गेल्या दहा-पंधरा दिवसात 325 ते 400 रुपये प्रति गोणी असे झाल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दिली आहे. मागणीमध्ये कोणतीही वाढ झाली नसताना कंपन्यानी केलेल्या या दरवाढीमुळे आता बांधकाम शुल्कात प्रति चौ. फु. 50 रुपये इतकी वाढ होणार आहे. परिणामी घरांच्या किमतीत प्रति चौ. फु. 50 ते 100 रुपयांची वाढ होऊन याचा फटका ग्राहकांना बसणार असल्याची माहिती असोसिएशनचे प्रवक्ते आनंद गुप्ता यांनी दिली आहे.

सिमेंट कंपन्यांची मनमानी ही सुरुवातीपासूनच आहे. त्यांच्या या मनमानी विरोधात 4-5 वर्षांपासून असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असून न्यायालयाने 13 कंपन्यांना 66 हजार कोटी दंड ठोठावला आहे. त्यातील 10 टक्के अर्थात 6 हजार कोटी रुपये कंपन्यांनी भरले आहेत. असे असताना आता कोरोनाच्या संकटात या कंपन्यानी सिमेंट दरवाढ केली आहे. हा न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान आहे, असे म्हणत गुप्ता यांनी याविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details