महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-3 : सीप्झ स्थानकाच्या सर्व स्लॅबचे बांधकाम पूर्ण - Mumbai Metro

मुंबईतील सीप्झ स्थानकाच्या स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या अंतर्गत सीप्झ, मरोळ नाका आणि एमआयडीसी मेट्रो स्थानकाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-3 : सीप्झ स्थानकाच्या सर्व स्लॅबचे बांधकाम पूर्ण

By

Published : Dec 22, 2020, 7:06 PM IST

मुंबई -कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 च्या कारशेडच्या कामाला ब्रेक लागला असला तरी मेट्रो मार्गाचे काम मात्र वेगात सुरू आहे. त्यानुसार आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने या मार्गातील एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. या अंतर्गत सीप्झ, मरोळ नाका आणि एमआयडीसी मेट्रो स्थानकाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या कामामुळे पॅकेज 7 मधील सर्व मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-3 : सीप्झ स्थानकाच्या सर्व स्लॅबचे बांधकाम पूर्ण

अशी आहेत स्थानके -

सीप्झ आणि एम.आय.डी.सी. स्थानके कट-अँड-कव्हर पद्धतीने बांधण्यात येत आहेत. मरोळ स्थानक मात्र एनएटीएम (न्यु ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड) पध्दतीने बांधले जात आहे. या प्रत्येक मेट्रो स्थानकात तीन ते चार प्रवेशद्वार असणार आहेत. या तिन्ही स्थानकांचे बेस स्लॅब, कॉन्कोर्स स्लॅब, मॅझेनाईन स्लॅब आणि रूफ स्लॅब असे सर्व स्लॅबचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने पॅकेज 7 मधील बांधकाम 76 टक्के पूर्ण झाले आहे.

सीप्झ मेट्रो स्थानक ठरणार महत्वाचे -

मेट्रो 3 च्या मार्गात एकूण 27 स्थानके आहेत. सर्वच स्थानके महत्वाची आणि प्रवाशांना सुविधा देणारी आहेत. पण सीप्झ मेट्रो स्थानक मात्र अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या परिसरात औद्योगिक वसाहती असून लहान-मोठे उद्योग आहेत. रुग्णालये, शाळा आणि इतरही अनेक कार्यालये या परिसरात आहेत. त्यामुळे हे स्थानक प्रवाशांसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details