मुंबई - एका महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे. नाले सफाई, पाणी उपसण्यासाठी पंपाची व्यवस्था, रेल्वे रूळ मार्ग सफाई, ओव्हर हेड वायरची देखभाल, झाडांच्या फांद्याची छाटणी अशी कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच सखल भागात पाणी साचू नयेत, म्हणून मायक्रोटनलची निर्मिती केली जात आहेत.
400 मीटर लांबीचा मायक्रोटनल-
रेल्वे मार्गावर ज्याठिकाणी पाणी साचण्याच्या घटना होतात. त्याठिकाणी आवश्यकतेनुसार जादा पंप बसविण्याची येणार आहे. तसेच रेल्वे मार्गाच्या लगत नाले असल्याने पाण्याचा निचरा होतो. मात्र, मध्य रेल्वेच्या सॅडहर्स्ट रोड भागात नाले नसल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी अडचणी होत होत्या. परिणामी, थोड्या पावसाने देखील रेल्वे रूळावर पाणी साचल्याच्या घटना घडत होत्या. मात्र, आता महापालिका आणि रेल्वेयांच्यावतीने सॅडहर्स्ट रोड येथे मायक्रोटनलची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. याचा व्यास 1.8 मीटर आहे. 400 मीटर लांबी आहे. या टनेलचे काम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत होणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसात पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत होणार आहे.
4 कोटी 5 लाख रुपयांचा खर्च-
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 400 मीटरपैकी आतापर्यंत 250 मीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सॅडहर्स्ट रोड येथे पुराचे पाणी येण्यापासून बचाव होणार आहेत. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे-खार भागात पुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मायक्रोटनलची निर्मिती करण्यात आली आहे. या कामासाठी एकूण 4 कोटी 5 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर, वसई रोड येथे भुयारी नाला तयार करण्यात येणार असून याचे काम मे अखेरीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
मरे आणि परेवर 284 पंप-
रेल्वे मार्गावर ज्याठिकाणी पाणी साचण्याच्या घटना होतात. त्याठिकाणी आवश्यकतेनुसार यंदा मध्य आणि पश्चिम जादा पंप बसविण्यात येणार आहे. यंदा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 284 पंप बसविण्यात आले आहे. ज्यामध्ये पश्चिम रेल्वेच्यावतीने पाण्याचा उपसा करण्यासाठी मागील वर्षीच्या 100 पंप बसविण्यात आले होते. यंदा 127 पंप बसविण्यात आले आहेत. 95 रेल्वे मार्गावर आणि 32 डेपो आणि काॅलनीमध्ये बसविण्यात आले आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील पाणी साचण्याच्या ठिकाणी एकूण 157 पंप बसविण्यात आले आहेत. मागीलवर्षी 143 पंप बसविण्यात आले होते. त्यामुळे यंदा पावसाच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपाची मदत होणार आहेत.