महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Political crisis in Maharashtra : सहयोगी पक्षांकडून शिवसेना कमकुवत करण्याचे कारस्थान; उदय सामंत यांचा आरोप - To Carry Forward The Idea of Hindutva

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे कारस्थान ( Conspiracy to Weaken The Party ) सहयोगी पक्षाकडून सुरू आहे. त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो, असे गंभीर आरोप बंडखोर आमदार उदय सामंत ( MLA Uday Samant ) यांनी केला. तसेच, आजही शिवसेनेत ( Even today in Shiv Sena ) आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासोबत आल्याचे स्पष्टीकरण सामंत यांनी केले.

Shiv Sena Minister Uday Samant
शिवसेना मंत्री उदय सामंत

By

Published : Jun 28, 2022, 5:37 PM IST

Updated : Jun 28, 2022, 6:18 PM IST


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे कारस्थान ( Conspiracy to Weaken The Party ) सहयोगी पक्षाकडून सुरू आहे. त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो, असे गंभीर आरोप बंडखोर आमदार उदय सामंत ( MLA Uday Samant ) यांनी केला. तसेच, आजही शिवसेनेत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी ( To Carry forward Idea of Hindutva ) एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्याचे स्पष्टीकरण सामंत यांनी केले. ( Even today in Shiv Sena ) आजही मी शिवसेनेत आहे.

उदय सामंत यांनी उदाहरणासह दिले पटवून : राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्च्या शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या निवडणुकीतदेखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे बंडखोर आमदार सामंत यांनी सांगितले.

अजूनही मी शिवसेनेतच आहे : आजही मी शिवसेनेतच असून, त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे सामंत यांनी सांगितले. एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसेनेने बळी पडू नका, अशी विनंती सामंत यांनी केली आहे.



मविआ सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठून बंड पुकारले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत युती करण्याची भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचा प्रस्ताव नाकरला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत युती करण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे ही भाजपसोबत युती करण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत, शिवसेनेच्या ३७ आणि अपक्ष ९ आमदारांना गळाला लावले. आतापर्यंत ५० हून अधिक आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत.

हेही वाचा : Rebel MLA Eknath Shinde : आम्ही लवकरच मुंबईत परतणार - एकनाथ शिंदे

Last Updated : Jun 28, 2022, 6:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details