महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेसने मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला - mumbai latest news

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी होत आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज काँग्रेसकडून फोडण्यात आला आहे.

संपर्क यात्रा
संपर्क यात्रा

By

Published : Feb 6, 2021, 5:31 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी होत आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज काँग्रेसकडून फोडण्यात आला आहे. आजपासून पुढील 20 दिवस मुंबईत संपर्क प्रचार यात्रा सुरू राहणार असल्याची माहिती, पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली.

रवी राजा

100 प्रभागात संपर्क यात्रा -

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 ला होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आपला महापौर निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सायन कोळीवाडा येथून प्रचाराची सुरुवात केली आहे. लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी काँग्रेसने दरदिवशी 5 प्रभाग या प्रमाणे पुढील 20 दिवस 100 प्रभागात संपर्क यात्रा काढणार असल्याची माहिती रवी राजा यांनी दिली.

महापौर आमचाचं -

आजपासून संपर्क यात्रेला सुरुवात झाली असून येत्या 20 दिवसात आम्ही लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर काम करणार आहोत. आजपासून काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडला. निवडणुकीत आमचाच किंवा आमच्या पाठिंब्याशिवाय कोणाचाच महापौर बनणार नाही, असे रवी राजा यांनी सांगितले. मुंबई काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या संपर्क यात्रेत मुंबई अध्यक्ष भाई जगताप, माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, प्रवक्ते राजू वाघमारे आदी मान्यवर उपस्थित आहेत.

मुंबई महापालिकेच्या सर्व जागा काँग्रेस स्वबळावर लढवणार?

काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वतः 227 जागांवर लढू इच्छिते. मी पदभार स्वीकारल्यानंतर तेच बोललो होतो. आजही मी त्यावर ठाम असल्याचे मुंबई प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक नेते काँग्रेस सोडून गेले आहेत. त्यांना पुन्हा परत आणणार. त्यांची घरवापसी केली जाणार असून, 100 दिवसाच्या कार्यक्रमात अनेक नेते काँग्रेसमध्ये येतील, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला होता. काँग्रेसचा महापालिकेत विरोधीपक्ष नेता कोण असावा याचा निर्णय काँग्रेसच घेणार. याचा कोणताही परिणाम सरकार आणि महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही, असेही जगताप यांनी सांगितले होते.

हेही वाचा-'सगळेच उपमुख्यमंत्रीपद मागत असतील, तर अपक्षालाही ते द्यावे'

ABOUT THE AUTHOR

...view details