मुंबई - ब्रिटीशांनी ज्याप्रमाणे भारतावर तर राज्य केले आहे. तशाच प्रमाणे सध्या केंद्रामध्ये सत्तेत असलेली भाजपा सरकार हुकूमशाही प्रमाणे काम करत आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली ( nana patole criticized bjp ) आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधींना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने चौकशीची नोटीस बजावली आहे. या प्रकरणी राहुल गांधी आज ( 13 जून ) ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. त्यांना पाठींबा देण्यासाठी आणि ईडीविरोधात मुंबईत काँग्रेसने आंदोलन ( congress workers protest outside ed office in mumbai ) केले. तेव्हा नाना पटोले बोलत होते.
नाना पटोले म्हणाले की, ब्रिटीशांनी ज्याप्रमाणे भारतावर तर राज्य केले आहे. तशाच प्रमाणे सध्या केंद्रामध्ये सत्तेत असलेली भाजपा सरकार हुकूमशाही प्रमाणे काम करत आहे. लोकांच्या भावना समजून न घेता तसेच गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना देखील केंद्र सरकारकडून अडवण्यात येत आहे. या हुकूमशाही सरकारचा काँग्रेसकडून निषेध करण्यात येते आहे. राहुल गांधी यांना ईडीकडून देण्यात आलेले समन्स हे केवळ गांधी परिवाराची बदनामी करण्यासाठीच देण्यात आले आहे, अशी टीकाही नाना पटोलेंनी भाजपावर केली आहे.