मुंबई - मुंबई महापालिकेच्या (२०१७)च्या निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या प्रभाग रचना बदलामुळे भाजपाला फायदा झाला होता. (Mumbai Municipal Corporation Ward Reconstruction) यासाठी प्रभाग रचनेत बदल करण्याची मागणी सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसकडून करण्यात आली होती. (Congress welcomes ward reorganization) निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेत बदल करण्यास तसेच त्यावर सूचना व हरकती मागवण्यास मंजुरी दिली आहे. याचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली आहे.
प्रभाग पुनर्रचनेची काँग्रेसची मागणी -
राज्यात (२०१७)मध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे सरकार होते. यावेळी पालिकेच्या २२७ जागांची पुनर्रचना करताना भाजपाने आपल्या सोयीप्रमाणे जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने पुनर्रचना केली. यात आपल्या पक्षाला कसा फायदा होईल, याकडे भाजपाने पाहिले. त्यामुळे भाजपला ४० ते ५० जागा अधिक मिळाल्या. ही बाब नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरूद्ध होती. तेव्हा काही नागरिकांनी हरकती आणि सूचनांमार्फत या पुनर्रचनेला विरोध करूनही त्यांना न्याय देण्यात आला नाही. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी केलेल्या ४५ प्रभागांच्या पुनर्रचनेत सुधारणा करून ही चूक दुरूस्ती करावी, अशी मागणी रवी राजा यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.
काँग्रेसने केले स्वागत -
२०१७ च्या निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमुळे भाजपाला फायदा झाल्याने त्याची पुनर्र्चना करण्याची मागणी रवी राजा यांनी केली होती. २०२२ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभाग पुनर्रचना करावी अशी त्यांची मागणी होती. त्यावर निवडणूक आयोगाने रवी राजा यांना पत्र लिहून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार असून त्यावेळी सूचना हरकती मागवल्या जातील असे कळविले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेबाबत सूचना व हरकती मागविण्यास व त्याचा अहवाल देण्यास पालिका आयुक्तांना कळवले आहे. याचे स्वागत करत असल्याचे रवी राजा यांनी सांगितले.
प्रभाग पुनर्रचनेला निवडणूक आयोगाची मान्यता -