मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 29, 30 आणि 31 जुलैला होणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची अंतिम यादी जुलै संपण्यापूर्वीच ठरणार आहे.
काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारांची अंतिम यादी जुलै संपण्यापूर्वीच - बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी जुलै संपण्यापूर्वी ठरणार आहे. यासाठी 29, 30 आणि 31 जुलै रोजी मुंबई आणि इतर जिल्ह्यांमध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारांच्या मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन निरीक्षकांची नेमणूक केली होती. त्याला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्यांच्या जिल्हा मुख्यालयी २९, ३०, ३१ जुलै होणार आहेत. निवडक नावे अंतिम मंजुरीसाठी दिल्ली मुख्यालयात पाठविली जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी जुलै संपण्यापूर्वी ठरणार आहे.