मुंबई -काँग्रेस पक्षाने एआयएमआयएमकडे कधीही मत मागितलेले नाही. मात्र त्यांना स्वतःहून काँग्रेसला मत द्यायचा असेल तर यावर काही हरकत नाही, असे एआयएमआयएमच्या ( AIMIM ) मतदानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच काँग्रेसच्या एकूण 44 मतदान पैकी 42 मत काँग्रेसचे उमेदवार राजू प्रतापगडी यांना देण्यात आली असून उर्वरित दोन मते महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) चौथे आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना देण्यात आले असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
Rajyasabha Polls : एआयएमआयएमकडे आम्ही मत मागितले नाही - नाना पटोले - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
एआयएमआयएमच्या ( AIMIM ) मतदानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एआयएमआयएमकडे कधीही मत मागितलेले नाही. तसेच काँग्रेसच्या एकूण 44 मतदान पैकी 42 मत काँग्रेसचे उमेदवार राजू प्रतापगडी यांना देण्यात आली असून उर्वरित दोन मते महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) चौथे आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना देण्यात आले असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
'मतदानावर आक्षेप घेऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न' :भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीच्या आमदार मतदारांवर आक्षेप घेऊन केवळ वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपला पराजय भारतीय जनता पक्षाला दिसत आहे, म्हणून अशा प्रकारचा आक्षेप त्यांच्याकडून घेतला जात आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही आपली मतपत्रिका भाजपा निवडणूक निरीक्षकाच्या हाती दिली होती. हे सर्व कॅमेरामध्ये कैद झाले आहे. यावर आक्षेप घेतल्यानंतर याबाबत सुधीर मुनगंटीवार गप्प बसले, असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.
हेही वाचा -Rajya Sabha Election 2022 : 'सर्व गणितं ठरलेली, विजय आमचाच' होणार- संजय राऊत