महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केंद्रातील सरकारही बरखास्त करा अन् देशात लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र घ्या - नाना पटोले - लोकसभा

मुंबईत झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करून हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या. भाजप जिंकून येईल असं वक्तव्य राष्ट्रीय प्रभारी आणि सरचिटणीस सीटी रवी यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेत राज्यातील नाहीतर केंद्रातील सरकार बरखास्त करा व दोन्ही निवडणुका एकत्र घ्या, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

नाना पटोले
नाना पटोले

By

Published : Nov 16, 2021, 5:13 PM IST

Updated : Nov 16, 2021, 7:54 PM IST

मुंबई- मुंबईत झालेल्या भाजप (bjp) कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करून हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या. भाजप जिंकून येईल असे वक्तव्य राष्ट्रीय प्रभारी आणि सरचिटणीस सी.टी. रवी यांनी केले होते. या विधानाचा समाचार घेत राज्यातील नाहीतर केंद्रातील सरकार बरखास्त करा व दोन्ही निवडणुका एकत्र घ्या, असे आव्हान काँग्रेस (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केले आहे.

बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

बॅलेट पेपरवर मतदान घ्या

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात बोलत असताना भाजप राष्ट्रीय प्रभारी व सरचिटणीस सी.टी. रवी यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. हिंमत असेल तर राज्यातील सरकार बरखास्त करा व पुन्हा निवडणुका घ्या. भाजप जिंकून येईल, असे सांगताना सध्याचे मुख्यमंत्री हे पार्टटाईम मुख्यमंत्री असल्याची टीकाही सी.टी. रवी यांनी केली. सी.टी. रवी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना केंद्रातील सरकार हे मशीन सरकार आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा करून हे सरकार निवडून आलेले आहे. हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करून लोकसभा व विधानसभा दोन्ही निवडणुका एकाच वेळी बॅलेट पेपरद्वारे घ्या. असे आव्हान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

काय म्हणाले सी.टी. रवी..?

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राज्याचे प्रभारी सी.टी. रवी यांनी हिंमत असेल तर विधानसभा बरखास्त करा व पुन्हा निवडणुका घ्या, असे आव्हान केले. शिवसेनेवर निशाणा साधत सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत आणि राज्याला फुलटाईम मुख्यमंत्र्यांची गरज आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.

हे ही वाचा -हिंमत असेल तर विधानसभा बरखास्त करुन पुन्हा निवडणुका घ्या - सी.टी. रवी

Last Updated : Nov 16, 2021, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details