मुंबई -रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणांमध्ये महाविकास आघाडी सरकारवर देवेंद्र फडणवीस आरोप करत होते. मात्र, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अहवालानंतर फडणवीस तोंडघशी पडले आहेत, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लावला आहे. मात्र, हे तर फक्त रश्मी शुक्ला यांनी अवैधरित्या केलेला फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे तोंडघशी पडले आहेत. येणाऱ्या काळात न्यायाधीश लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरण समोर आणू तसेच अजून अशाच प्रकारचे काही प्रकरणे आहेत, ज्यामुळे भाजप कोंडीत सापडेल, अशी प्रकरणे समोर आणणार आहोत, अशा प्रकारचा इशारा नाना पटोले यांनी भाजपला दिला आहे.
हेही वाचा -वनअधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्या, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला अटक
काँग्रेसने कधीही अधिकाऱ्यांचा वापर राजकारणासाठी केला नाही - पटोले
सध्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून महाराष्ट्राची बदनामी करण्याचे राजकारण केलं जात आहे, असा आरोप नाना पटोले यांच्याकडून करण्यांत आला. मात्र, असं राजकारण कधीही काँग्रेसने केलं नाही. काँग्रेसने कधी अधिकाऱ्यांचा वापर राजकारणासाठी केला नाही, असा टोला नाना पटोले यांनी भाजपला लगावला. तर तिथेच अधिकाऱ्यांनी देखील आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. तसेच ज्या प्रकारे गोपनीयतेची शपथ मंत्र्यांना दिली जाते, त्याचप्रकारे अधिकाऱ्यांनीही गोपनीयतेची शपथ दिली जाते ही आठवण त्यांनी करून दिली. अधिकाऱ्यांनी जनतेसाठी काम करावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच जे अधिकारी चुकीचे काम करत असतील त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही, हे देखील नाना पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा -एनईईटी, जेईई, सीईटी सारख्या प्रवेश परीक्षांपासून ग्रामीण विद्यार्थी वंचित