महाराष्ट्र

maharashtra

Nana Patole Criticized BJP : 'आठ वर्षाच्या कमकुवत सरकारने देश बरबाद केला'

By

Published : May 30, 2022, 4:47 PM IST

काँग्रेसच्या ( Congress ) एका निर्णयावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने राहतो, प्रयत्नांचीच एक मानसिकता असेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ( Congress State President Nana Patole ) भाजपावर केली आहे. राज्यसभेसाठी ( Rajya Sabha elections 2022 ) काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगडी ( Congress candidate for Rajya Sabha Imran Pratapgadi ) यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Nana Patole Criticized BJP
Nana Patole Criticized BJP

मुंबई - बाहेरच्या राज्यातील उमेदवार दिल्यावरून टीका करणाऱ्या भाजपाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलेच कान टोचले आहे. तसेच काँग्रेसवर कुरघोडी करणाऱ्या भाजपाला खडे बोल सुनावले. काँग्रेसच नाही अनेक पक्षांनी मागच्या काळात बाहेरच्या राज्यातील उमेदवार आणले. त्या वेळीस चर्चा नाही. पण सध्या काँग्रेसची एक चूक नसेल तरी त्याला चूक दाखवण्याची ही परंपराच आलिकडच्या काळामध्ये केंद्रातल्या आठ वर्षाच्या कमकुवत सरकारने देश बरबाद केला. काँग्रेसच्या ( Congress ) एका निर्णयावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने राहतो, प्रयत्नांचीच एक मानसिकता असेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ( Congress State President Nana Patole ) भाजपावर केली आहे. राज्यसभेसाठी ( Rajya Sabha elections 2022 ) काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगडी ( Congress candidate for Rajya Sabha Imran Pratapgadi ) यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.



प्रतापगढीची मराठीत शपथ :काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी उमेदवारी फॉर्म भरताना, मराठीत शपथ घेतली. देशाची एकात्मता, त्या विचाराला, भाषेला मानणारा उमेदवार काँग्रेस हायकामंडने दिला. त्याबद्दल नेत्या सोनिया गांधी आणि आमचे नेते राहुल गांधी यांचे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो.



'भाजपाने मॅजिक फिगर सांगावा' :राज्यसभेच्या निवडणुकीला जास्त दिवसांचा कालावधी नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सत्तेची दिवसा स्वप्न बघणारे विरोधक आहेत. वारंवार तारखा सांगत असतात. आताही उमेदवार निवडून आणण्याचा दावा करत आहेत. मुळात राज्यसभेचे मतदान खुल्या पध्दतीने होते. अशावेळी मताधिक्य असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. भाजपाकडे मताधिक्याचा कोणता मॅजिक आकडा आहे ते जनतेला कळू दे, असे आव्हान नाना पटोले यांनी केले. तसेच राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होते, आजपर्यंत परंपरा राहिली आहे. विरोधात दावा करत असतील तर त्यावर मी आता प्रतिक्रिया देणार नाही, असेही पटोले म्हणाले.


'काँग्रेसमध्ये लोकशाही' :प्रत्येकाला व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री नगमा आणि काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी ते मांडल आहे. त्यावर प्रतिक्रिया देणे उचित नाही कारण काँग्रेसमधील लोकशाही असून प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार इथे आहे. भाजपामध्ये मात्र उलट आहे. इच्छा असूनही इकडे बोलता येत नाही. कारण त्यांच्याकडे लोकशाही नाही, असेही पटोले यांनी सांगितले. भाजपामध्ये मोठी कुरघोडी असल्याचेही ते म्हणाले.


किमान समान कार्यक्रमाचा आढावा :राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. सत्ता स्थापनेवेळी किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला होता. त्यानुसार काम होते का याचा आढावा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी घेणार आहेत. सरकार पडण्याची विरोधकांना घाई आहे. मात्र अजून अडीच वर्ष शिल्लक आहेत. त्यामुळे फक्त किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी होतेय का, याबाबत आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक नेत्या सोनिया गांधी घेणार, असल्याचे पटोलेंनी स्पष्ट केले.

हेही वाचा -आमचे तीन आणि त्यांचे तीन उमेदवार ठरले तर घोडेबाजार होणारच नाही - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details