महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपाने ओबीसी समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला - नाना पटोले - ओबीसी

ओबीसी समाजाने २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठ्या प्रमाणात मतदान करुन केंद्रात सत्ता दिली. पण, भाजपाने ओबीसी (OBC) समाजाच्या कल्याणासाठी काहीही केले नाही. भाजपाने ओबीसी समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला, अशी टीका काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

नाना पटोले
नाना पटोले

By

Published : Nov 22, 2021, 9:59 PM IST

मुंबई- ओबीसी समाजाने २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठ्या प्रमाणात मतदान करुन केंद्रात सत्ता दिली. पण, भाजपाने ओबीसी (OBC) समाजाच्या कल्याणासाठी काहीही केले नाही. भाजपाने ओबीसी समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला, अशी टीका काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या नवनिवयुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते.

... तोपर्यंत संघर्ष करू

ओबीसी समाज मागणारा नाही. पण, संविधानाने दिलेले हक्क समाजाला मिळाले पाहिजेत आणि हे अधिकार मिळत नाहीत तोपर्यंत संघर्ष करत राहू. आता ओबीसी समजावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही मागणी वारंवार होत आहे. कुठल्याही परिस्थितीत ओबीसी सामजाचे आरक्षण टिकून राहील, असे वक्तव्यही नाना पटोले यांनी केले आहे.

ओबीसी लढाई मोठ्या शिताफीने लढावी लागणार

ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. पण, या समाज घटकाला योग्य न्याय मिळत नाही. संविधानाने जे हक्क दिलेले आहेत ते समाजाला मिळाले पाहिजेत त्यासाठी संघर्ष करू. आपल्या न्याय हक्क व मागण्यासांठी काँग्रेस पक्ष सदैव आपल्यासोबत असेल, असेही नाना पटोले यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, ओबीसी समाजासाठी लढाई मोठ्या शिताफिने लढावी लागणार आहे. ओबीसींच्या शिष्यवृत्तीसाठी १९९९ साली आपण आमदार असताना आग्रही मागणी करून त्याचा पाठपुरावा केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ओबीसी समाजातील मुलांना दहावीपर्यंत शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. भानुदास माळी यांची ओबीसी विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून ते राज्यात संघटन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. हे संघटन उभे करुन काँग्रेस पक्षाची ताकद कशी वाढले यासाठी काम करा, असे आव्हानही पटोले यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, सरचिटणीस देवानंद पवार, सरचिटणीस प्रमोद मोरे दिप्ती चवधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा -MAHARASHTRA CORONA UPDATE - 768 रुग्णांना डिस्चार्ज, आढळले 656 नवे रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details