महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nana Patole Criticized BJP : देशात भाजपा पक्ष हा दलांलाचा ठेकेदार - नाना पटोले - देशात भाजपा पक्ष हा दलांलाचा ठेकेदार

देशातील सर्वात मोठा डिलर व ब्रोकरचे काम करणाऱ्या भारतीय जनात पक्षाने ( BJP ) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर ( Congress NCP and Shiv Sena ) आरोप करणे हेच हास्यास्पद आहे. भाजपाने काँग्रेसकडे उंगली निर्देश करू नये, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Home Minister Amit Shah ) यांच्यावर केली आहे.

नाना पटोले
नाना पटोले

By

Published : Dec 20, 2021, 3:18 PM IST

मुंबई - देशात भाजपा हा दलालांचा ठेकेदार आहे. त्यांनी अनेक महत्वाच्या सार्वजनिक कंपन्या आपल्या मोजक्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालणारा देशातील सर्वात मोठा डिलर व ब्रोकरचे काम करणाऱ्या भारतीय जनात पक्षाने ( BJP ) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर ( Congress NCP and Shiv Sena ) आरोप करणे हेच हास्यास्पद आहे. भाजपाने काँग्रेसकडे उंगली निर्देश करू नये, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Home Minister Amit Shah ) यांच्यावर केली आहे.


  • 'खोट बोलणं भाजपाची पध्दत'

डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना १ जानेवारी २०१३ रोजी काँग्रेस प्रणित युपीए सरकारने सुरु केली. त्याचे श्रेयही अमित शहा भाजपाला देत आहेत. हे दुर्दैवी आहे. काँग्रेसच्या चांगल्या योजना स्वतःच्या नावावर खपवून बिनदिक्कतपणे खोटे बोलणे, हे भाजपाची पद्धतच आहे. पण त्या योजनेचा शब्दच्छल करत डिलर, ब्रोकर, ट्रान्सफर अशा उपमा देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर टीका करणारा भारतीय जनता पक्षच खऱ्या अर्थाने या देशातील सर्वात मोठा डिलर व ब्रोकर आहे. राफेल सौद्यात करोडो रुपयांची दलाली कोणी खाल्ली? नोटबंदीमध्ये नोटा बदलण्याच्या कामात कोणत्या पक्षाच्या लोकांनी भरमसाठ दलाली केली? आणि देशातील सार्वजनिक बँका, विमानसेवा, विमानतळ, रेल्वे, रस्ते, विमा कंपनी हे खासगी उद्योगपतींच्या घशात घालण्याच्या डिल कोणी केल्या आणि त्यासाठी ब्रोकरचे काम करत कोणी पैसे खाल्ले हे जनतेला माहित आहे. त्यामुळे आतातरी भाजपाने महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्याचे उद्योग थांबवावेत, असा इशारा पटोले यांनी अमित शहा व भाजपाला दिला.

  • 'कोरोना काळात पंतप्रधान गायब'

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन निवडणुका घ्यावात, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य चुकीचे असून त्यांनी लोकशाहीचा सन्मान करायला शिकले पाहिजे. सत्तेच्या गुर्मीत असणारेच अशी वक्तव्ये करतात. महाराष्ट्र सरकारबरोबरच केंद्रातील भाजपा सरकारही बरखास्त करा आणि निवडणुका घ्या, मग पहा भाजपाविरोधात देशातील जनतेत किती असंतोष आहे हे तुम्हाला कळेल, असे प्रतिआव्हान नाना पटोले यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांना शोधावे लागते असे म्हणणाऱ्या अमित शहा यांनी पंतप्रधान कुठे असतात ते सांगावे. कोरोनाकाळात लाखो हिंदू लोकांचाही जीव गेला. त्यावेळी हिंदुत्वाचे हे ठेकेदार काय करत होते? कोरोनाकाळात पंतप्रधान गायबच होते, ते फक्त टीव्हीवरच दिसायचे, त्यांनाच शोधावे लागते. १४ महिने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होता तेंव्हा पंतप्रधान शेतकऱ्यांना भेटताना दिसले नाहीत, ते कुठे होते ? असे सवालही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारले.

हेही वाचा -Amit Shah on Uddhav Thackeray :..तर राजीनामा द्या अन् मैदानात उतरा, अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details