मुंबई- कोरोनाची भयंकर परिस्थिती राज्यात निर्माण झालेली असताना भाजपकडून आज करण्यात येत असलेल्या आंदोलनावर राज्यभरात #महाराष्ट्रद्रोहीBJP हा ट्रेंड जोरात सुरू आहे. अशातच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करून भाजपला महाराष्ट्रद्रोही असे म्हटले आहे.
सावंत यांनी यासाठी एक बारा ओळीची कविता केली असून त्या कवितेत त्यांनी ' मरो जनता हवी सत्ता, #महाराष्ट्रद्रोहीBJP नाव तयांचे,' असे म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला मदत करण्याऐवजी भाजपकडून सरकारविरोधात आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका करत ही कविता केली आहे.