मुंबई - नरेंद्र मोदी सरकार कोरोनाच्या संकटात मदत करतानाही महाराष्ट्राशी भेदभाव करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोरोनाकाळात ४० देशांनी केलेल्या मदत वाटपात मोदी सरकारने महाराष्ट्राला डावलले आहे. महाराष्ट्र वगळून भाजपाशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, बिहार व अन्य राज्यांना मदत दिली जात आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत असून राज्यातील भाजपा व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय मदतीतही केंद्राने डावलले, सचिन सावंतांचा आरोप
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार महाविकास आघाडी सरकारला सातत्याने सापत्नभावाची वागणूक देत आहे. सुरुवातीला कोरोनासंदर्भातील वैद्यकीय साहित्य पुरविण्यात भेदभाव केला, त्यानंतर रेमडेसिवीर, ऑक्सिजन तसेच लस पुरवठा करण्यातही दुजाभाव केला जात आहे. केवळ विरोधी पक्षाचे सरकार असल्याने केंद्र सरकारव अन्याय केला जात आहे, असेही सावंत म्हणाले.
जवळपास २५ विमानांनी अनेक देशांतून देशाला मदत आली आहे. या देशांमधील अनेक भारतीय वंशाच्या लोकांना भारतातील आपापल्या राज्यांना मदत करावयाची आहे. सदर आंतरराष्ट्रीय मदतीवर राज्य सरकाराचाही हक्क असताना ती थेट राज्यांना का दिली जात नाही? केवळ केंद्रीय यंत्रणांकडून त्याचे होणारे वाटप हे पीएम केअर फंडाप्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे आहे. तसेच ते संघराज्य पध्दतीला छेद देणारेही आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार महाविकास आघाडी सरकारला सातत्याने सापत्नभावाची वागणूक देत आहे. सुरुवातीला कोरोनासंदर्भातील वैद्यकीय साहित्य पुरविण्यात भेदभाव केला, त्यानंतर रेमडेसिवीर, ऑक्सिजन तसेच लस पुरवठा करण्यातही दुजाभाव केला जात आहे. केवळ विरोधी पक्षाचे सरकार असल्याने केंद्र सरकारव अन्याय केला जात आहे, असेही सावंत म्हणाले.