मुंबई :भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी जोरदार टीका केली ( Atul Londhe Criticized Kirit Somaiya ) आहे. सगळ्यांचे वाईट होवो, असे म्हणणारी गावात काळ्या बाहुल्या घेऊन फिरणारी बाई म्हणजे किरीट सोमय्या, अशी टीका त्यांनी केली आहे.
Atul Londhe Criticized Kirit Somaiya : किरीट सोमय्या म्हणजे गावात काळ्या बाहुल्या घेऊन फिरणारी बाई - अतुल लोंढे - BJP Leader Kirit Somaiya
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली ( Atul Londhe Criticized Kirit Somaiya ) आहे. किरीट सोमय्या म्हणजे करणी करणारी बाई आहे, अशा शब्दात लोंढे यांनी सोमय्यांवर निशाणा साधला ( Kirit Somaiyas Allegations Are Baseless ) आहे.
आरोप बिनबुडाचे : किरीट सोमय्या हे अत्यंत बिनबुडाचे आरोप करत सर्वत्र फिरत ( Kirit Somaiyyas Allegations Are Baseless ) आहेत. टू जी, थ्री जी, कोळसा घोटाळा असे अनेक आरोप भाजपाच्यावतीने करण्यात आले. मात्र संबंधित सर्व आरोप बिनबुडाचे सिद्ध होऊन संबंधित लोक निर्दोष बाहेर आले. केवळ राजकारण गढूळ करणे आणि संशयाचे वातावरण निर्माण करणे हाच भाजपचा धंदा झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना का सोडले आहे हे आता जनतेला कळून चुकले आहे. वास्तविक त्यांच्या आरोपांची दखल अथवा बोलण्याची दखल घ्यायची ही त्यांची पात्रता राहिलेली नाही. अशी गावात एखादी काळी जादू करणारी, बाहुल्या घेऊन फिरणारी, गावाचे वाईट चिंतणारी बाई असते तसेच सोमय्या आहेत, अशी परखड टीका अतुल लोंढे यांनी केली आहे.
हेही वाचा : रश्मी शुक्लांना आदेश देणाऱ्या 'बिग बॉस’चा शोध घ्यावा - अतुल लोंढे