मुंबई- नक्षली आणि दहशतवादी हल्ले रोखण्यात भाजप सरकार नेहमीच अपयशी ठरले आहे. इतिहासात कधी नव्हे ते इतक्या प्रमाणात काश्मीरसह देशभरात जवान हुतात्मा झाले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली. गडचिरोलीमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ला हे मोदी-फडणवीस सरकारचे पातक - सचिन सावंत - gadchiroli naxal attack
'घुसकर मारा'च्या बाता मारणाऱ्या सरकारच्या कृतीशुन्यतेचा परीपाक या घटनेला म्हणता येईल, अशी जळजळीत टीका सचिन सावंत यांनी केली.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत
गडचिरोलीमध्ये झालेला नक्षलवादी हल्ला ही दुर्दैवी घटना आहे. आमच्या सर्व संवेदना हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या कुटुंबाप्रति आहेत, असेही ते म्हणाले. शिवाय 'घुसकर मारा'च्या बाता मारणाऱ्या सरकारच्या कृतीशुन्यतेचा परीपाक या घटनेला म्हणता येईल, अशीही जळजळीत टीका सावंत यांनी केली.
या सरकारच्या काळात सर्वाधिक दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ले झालेत. हा सराकरी नियोजनशुन्यता आणि धोरण नसल्याचा परिणाम असून नक्षलवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.