मुंबई -वाढती महागाई, बेरोजगारी, मोदी सरकारची दडपशाहीच्या विरोधात आज काँग्रेसने देशभर आंदोलन ( Congress protests across country against inflation ) पुकारले. महाराष्ट्रासह, मुंबईत सुद्धा राजभवनला घेराव घालण्यासाठी काँग्रेसने आज आंदोलन केले. परंतू, पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांना 149 ची नोटीस देत ताब्यात घेतले असून, आंदोलन करण्यापासून रोखले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा काँग्रेसने तीव्र निषेध केला असून कितीही प्रयत्न केले तरी, आमचा आवाज दडपला जाणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी सांगितले आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबईत १० हजार कार्यकर्त्यांना अटक -याप्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेृत्वाखालील आज आम्ही देशभर आंदोलन करत आहोत. मोदी सरकारने जीएसटी च्या माध्यमातून जी काही महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, अग्निपथ योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व मुद्द्यांवर देशभर आज आम्ही आंदोलन करत आहोत. पण कालपासूनच आमच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. एकट्या मुंबईत १० हजार पेक्षा जास्त व महाराष्ट्रात १ लाख पेक्षा जास्त काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी आज अटक केली आले आहे, असे नाना पटोले म्हणाले.