मुंबई -महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या शाईने नोंद होणारी ही घटना आहे. आता स्थापन झालेले सरकार घटनाबाह्य असून आम्ही तिघे मिळून त्यांचा पराभव करू, असा विश्वास काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी व्यक्त केला. मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा... राष्ट्रवादीच्या गटनेत्याचा आम्हाला पाठिंबा, आम्ही स्थिर सरकार देऊ - दानवे
राज्यपालांनी काँग्रेसला संधी द्यायला हवी होती. सह्यांचे निवेदन राज्यपालांनी आधी तपासून पहायला हवे होते. जे होत आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. घटनेची पायमल्ली झाली असून लोकशाहीचा खून झाला आहे, असे अहमद पटेल यावेळी म्हणाले.
हेही वाचा... अरे..राऊत आता तरी शांत बस बाबा...चंद्रकांत पाटलांचा सेनेवर 'बाण'
काँग्रेसने सत्तास्थापनेच्या चर्चेस उशीर केल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही उशीर केला नाही. अजित पवारांचा निर्णय धक्कादायक आहे. त्यांच्यावर कारवाईच्या संदर्भात सहकारी पक्षांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. आमचे सर्व आमदार एक असून भाजपला शह देण्यासाठी तयार आहेत. सरकार आम्हीच बनवणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.