महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेस, राष्ट्रवादीसह सेनेचे नेते उद्या घेणार राज्यपालांची भेट

सत्तास्थानेसाठी पुढाकार घेणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. नुकसान भरपाई आणि अतिवृष्टीच्या विषयासाठीची ही भेट असल्याचे जरी कारण पुढे केले असले तरी या बैठकीत सत्तास्थापनेच्या विषयांवरही चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेचे नेते उद्या घेणार राज्यपालांची भेट

By

Published : Nov 15, 2019, 1:32 PM IST

Updated : Nov 15, 2019, 1:49 PM IST

मुंबई- काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते उद्या(शनिवार) दुपारी तीन वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यातील दुष्काळाच्या संदर्भात ही भेट असून, त्यात सत्तास्थापनेचा कोणताही विषय नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेचे नेते उद्या घेणार राज्यपालांची भेट

हेही वाचा -...म्हणून माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

राज्यात ओल्या दुष्काळामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले असून त्यांना तातडीची मदत मिळावी, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उद्या दुपारी तीन वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली असून त्याला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही दुजोरा दिला आहे.

हेही वाचा -BREAKING: मुख्यमंत्री निश्चितपणे शिवसेनेचा होणार - नवाब मलिक

राज्यात सेना काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या सत्तास्थापनेसाठी जोरात हालचाली सुरू असतानाच उद्या राज्यपालांची घेण्यात येणारी भेट ही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. या भेटीत राज्यपालांना तिन्ही पक्षांकडून एकत्र निवेदन दिले जाणार आहे. या निवेदनात राज्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे, यासोबतच पीक विमा, कर्जमाफी, नवीन कर्ज आणि इतर मदतीसाठीची मागणी केली जाणार आहे.

दरम्यान, आज दुपारी चार वाजता काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणही राज्यातील दुष्काळाच्या संदर्भात होत असलेल्या दिरंगाईवर माध्यमांशी बोलणार असून त्यात ते भूमिका मांडणार आहेत.

राज्यपालांसोबतची बैठक महत्वाची-

सत्तास्थानेसाठी पुढाकार घेणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. नुकसान भरपाई आणि अतिवृष्टीच्या विषयासाठीची ही भेट असल्याचे कारण पुढे केले असले तरी या बैठकीत सत्तास्थापनेच्या विषयांवरही चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सत्तास्थापेनसाठी शिवसेनेला दिलेला वेळ कमी पडला होता. त्यावरुनही सेनेने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर उद्या तिन्ही पक्षांची एकत्र बैठक राज्यपालांबरोबर होणार आहे.

Last Updated : Nov 15, 2019, 1:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details