महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंत्रीपदाच्या काळात एकही मिनिट वाया न घालवता जनतेची कामे करणार - यशोमती ठाकूर - maharashtra government Cabinet expansion

मंत्रीपदाच्या संधीचे सोने करण्यासाठी अविरत आपण श्रम आपण करणार आहोत. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून लोकांचे प्रश्न समजून घेत, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

Yashomati Thakur
यशोमती ठाकूर

By

Published : Dec 30, 2019, 5:54 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज सोमवारी मुंबईत विधिमंडळ परिसरात पार पडला. यावेळी काँग्रेसकडून आमदार यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

आमदार यशोमती ठाकूर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रतिक्रिया...

हेही वाचा... 'नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक दलित-विरोधी'

मंत्रीपदाच्या काळात एकही मिनिट वाया न घालवता जनतेची कामे करणार - यशोमती ठाकूर

आमदार यशोमती ठाकूर यांनी आज सोमवारी, काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या सोबत बातचित केली असता, त्यांनी आपण महाराष्ट्रातील जनतेसाठी अखंड परिश्रम करणार असल्याचे म्हटले आहे. मंत्रीपदाच्या संधीचे सोने करण्यासाठी अविरत आपण श्रम आपण करणार आहोत. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून लोकांचे प्रश्न समजून घेत, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री, पाहा संपूर्ण यादी

आमदार यशोमती ठाकूर यांची राजकीय घोडदौड...

तिवसा मतदारसंघात गेल्या तीन पंचवार्षिकपासून अॅड. आमदार यशोमती ठाकूर निवडून येत आहेत. यशोमती ठाकूर यांना 2004 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर सलग तीनदा त्या विजयी झाल्या. काँग्रेस पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी चोखपणे पार पाडत इतरही राज्यात यश संपादन करून आपली पक्षनिष्ठा दाखवून दिली आहे. ठाकूर या राहुल ब्रिगेडच्या महत्त्वाच्या पदाधिकारी म्हणून ओळखल्या जातात.

ABOUT THE AUTHOR

...view details