मुंबई - "काँग्रेस मधून गद्दार पडले बाहेर, काँग्रेस झाली स्वच्छ" अशा घोषणा देत, काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशाचा आनंद कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आज सकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांसह काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्तिथीत भाजपात प्रवेश केला.
कालिदास कोळंबकर यांचा भाजप प्रवेश, काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाटले लाडू - congress
कोळंबकर यांच्या निर्णयाचा काँग्रेसला कोणताही धक्का बसला नाही. तसेच, कोळंबकर यांनी काँग्रेस सोडल्याने काँग्रेस आता स्वच्छ झाली आहे. त्याचा आनंद कार्यकर्ते व्यक्त करत असल्याचे पक्षाचे प्रवक्ता राजू वाघमारे यांनी सांगितले.
कोळंबकर यांच्या निर्णयाचा काँग्रेसला कोणताही धक्का बसला नाही. तसेच, कोळंबकर यांनी काँग्रेस सोडल्याने काँग्रेस आता स्वच्छ झाली आहे, त्याचा आनंद कार्यकर्ते व्यक्त करत असल्याचे पक्षाचे प्रवक्ता राजू वाघमारे यांनी सांगितले. गेले अनेक दिवस वडाळा विधानसभा मतदारसंघात उत्साह नव्हता, आता कोळंबकर भाजपात गेल्याने हा उत्साह पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये संचारला आहे. आगामी निवडणुकीत कोळंबकर यांचा पराभव हेच कार्यकर्ते करतील, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
कोळंबकर मूळचे काँग्रेसचे नाहीत. ते शिवसेना, स्वाभिमान पक्ष फिरून आले होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने पक्षाचे कोणतेही नुकसान झाले नाही. उलट, आता निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळेल असेदेखील त्यांनी सांगितले.