मुंबई- हायकमांडचा आदेश आल्याशिवाय प्रचारात उतरणार नाही, अशी भुमिका घेणारे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर अखेर महायुतीच्या गोटात सामिल झाले आहेत. महायुतीचे दक्षिण- मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा विजय होणार असून आपण शेवाळे यांच्या प्राचारात सहभागी होऊ असे म्हणत त्यांनी राहुल शेवाळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर महायुतीच्या गोटात; राहुल शेवाळेंचा करणार प्रचार - कालिदास कोळंबकर
काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर अखेर महायुतीच्या गोटात सामिल झाले आहेत. महायुतीचे दक्षिण- मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा विजय होणार असून आपण शेवाळे यांच्या प्राचारात सहभागी होऊ असे म्हणत त्यांनी राहुल शेवाळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
![काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर महायुतीच्या गोटात; राहुल शेवाळेंचा करणार प्रचार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3032754-thumbnail-3x2-kali.jpg)
काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर
काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर
वडाळा- नायगाव परिसरात शेवाळे यांच्या प्रचार यात्रेदरम्यान राहुल शेवाळे आणि कालिदास कोळंबकर यांची सदिच्छा भेट झाली, त्यावेळी कोळंबकर बोलत होते. दक्षिण- मध्य मुंबईत असलेल्या 6 आमदारांपैकी केवळ 2 आमदार काँग्रेसचे आहेत. मात्र, कालिदास कोळंबकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. "लवकर मुख्यमंत्र्यांना भेटून आपण अधिकृतरित्या महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार करणार असल्याचेही कोळंबकर यांनी स्पष्ट केले होते.