महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेस मंत्र्यांनी अर्थमंत्र्यांकडे वाढीव निधी मागितला तर गैर काय? - नाना पटोले - mumbai marathi news

महाविकास आघाडीचे हे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे.

Congress state president Nana Patole
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

By

Published : Feb 25, 2021, 7:47 PM IST

मुंबई - महाविकास आघाडीचे हे दुसरे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. अनेक मुद्द्यावरून हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. तत्पूर्वी महाविकास आघाडी मधील काँग्रेस पक्षाने देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी निधी संदर्भातली आपली नाराजी व्यक्त केली आहे.

यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांना वाटतं की, आपल्या खात्याला चांगला निधी मिळावा. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या खात्याला वाढीव निधी देण्यात यावा, अशी मागणी केली. यात काहीही गैर नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसून हे सरकार पाच वर्षे चालणार आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

काँग्रेस मंत्र्यांनी घेतली महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट-

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस मंत्र्यांनी भेट घेऊन अर्थमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात आपली नाराजी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक विभागाच्या बैठका घेऊन नेमका त्या विभागातला लागणारा निधी या संदर्भाचा आढावा घेतला. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या संबंधित विभागाला निधी दिला जाणार आहे. मात्र काँग्रेस मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या खात्यांना अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून कमी निधी दिला जातोय. अशाप्रकारची खंत व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांचा तर सामना करावाच लागणार आहे. मात्र अधिवेशनाआधीच आपल्या सहकारी पक्षाकडून देखील नाराजीचा सामना करावा लागतोय.

सर्व मंत्र्यांना वाढीव निधी मिळावा अशी अपेक्षा- नाना

प्रत्येक मंत्र्याला वाटते आपल्याला निधी जास्त मिळावा आणि जर तशी मागणी केली तर यात चूक काय? असं मत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल. अर्थमंत्र्यांनी सर्व खात्यांच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या कामाबद्दल विचारणा केली. त्यानुसार निधी वितरित केला जाणार आहे. मात्र प्रत्येक मंत्र्याला असं वाटतं की आपल्या खात्याला चांगला निधी मिळावा. तसेच काँग्रेसच्या मंत्र्यांनाही वाटतं यात काही गैर नाही असे स्पष्टीकरण नाना पटेल यांनी दिली.

नाना पटोले यांची राज्यपालांवर पुन्हा टीका -

राज्यपाल अजूनही 12 आमदारांच्या दिलेल्या पत्रावर सही करत नाहीत. आता केवळ राजकीय नेतेच नाही तर राज्यातील जनता देखील राज्यपाल त्या पत्रावर सही केंव्हा करणार, असा प्रश्न विचारु लागली आहे. असं म्हणत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर टीका केली. राज्यपालांच्या अशा वागण्याने राज भवन आता भाजपचे कार्यालय झाले की काय?, असा प्रश्न सामान्य जनतेला पडतोय असाही टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा-‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) प्लॅटफॉर्म्ससाठी नवी नियमावली

ABOUT THE AUTHOR

...view details