मुंबई -मुंबईमधील प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांत ( Mumbai House Scam ) ९३८० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप मुंबई मनपाचे माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा ( Ravi Raja ) यांनी केला आहे. मुलुंड, भांडुप, वरळी आदी ठिकाणी १४ हजार घरे बांधली जाणार होती. या प्रकल्पाची रेडी रेकनर नुसार मुळ किंमत ३२०० कोटी होती. परंतु पालिकेने विकासकांना प्रिमियम क्रेडिट नोट, भुखंड टीडीआर, कंन्स्ट्रकशन टिडीआर मधून बिल्डरला ९३८० हजार कोटींचा फायदा करून देण्यात आला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
काय आहे रवी राजा यांचा आरोप -मुलुंड, भांडुप, वरळी आदी ठिकाणी १४ हजार घरे बांधली जाणार होती. या प्रकल्पाची रेडी रेकनर नुसार मुळ किंमत ३२०० कोटी होती. परंतु पालिकेने विकासकांना प्रिमियम क्रेडिट नोट, भुखंड टीडीआर, कंन्स्ट्रकशन टिडीआर मधून बिल्डरला ९३८० हजार कोटींचा फायदा करून देण्यात आला. हा पालिकेतील सर्वात मोठा भूखंड टीडीआर घोटाळा आहे. मुंबईकरांच्या पैशांची ही उधळपट्टी असल्याने या प्रकरणी काँग्रेसने लोकायुक्तांना, पालिका आयुक्तांना आणि सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनला पत्र दिले आहे. या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिला आहे.
विरोध न जुमानता प्रस्ताव मंजूर -मुंबई महापालिकेत आयोजित एका पत्रकार परिषदेत रवी राजा बोलत होते. यावेळी बोलताना गेले कित्येक वर्षे प्रकल्पग्रस्तांना घरे द्या अशी मागणी केली जात आहे. पालिकेने प्रकल्पग्रस्तांना घरे देण्यासाठी खासगी भूखंडांवर पीएपीची घरे बांधण्याचा निर्णय घेतला. तसा प्रस्ताव पालिकेच्या सुधार समिती आणि सभागृहात आला असता त्याला काँग्रेसने विरोध केला होता. मात्र हा विरोध न जुमानता सत्ताधारी शिवसेनेने याबाबतचे प्रस्ताव मंजूर केले होते असे रवी राजा म्हणाले.