महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पेगॅससच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यांचे राजभवनासमोर निदर्शने - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून पेगॅसस प्रकरणाविरोधात निवेदनही देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली निदेर्शने करण्यात आली असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राजभवनासमोर निदर्शने
राजभवनासमोर निदर्शने

By

Published : Jul 22, 2021, 6:35 PM IST

मुंबई- केंद्र सरकार पेगॅसस सॉफ्टवेयरचा वापर करून राजकीय नेते, पत्रकार यांचे फोन हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याच्या गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी गदारोळ घातला आहे. याच मुद्द्यावरून आता राज्यातील काँग्रेसही आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून आज या मुद्द्यावर राजभवनाबाहेर निदर्शने करण्यात आली. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून पेगॅसस प्रकरणाविरोधात निवेदनही देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यपालांना निवेदन दिले

राज्यात आणि देशांमध्ये अनेक नेत्यांचे आणि पत्रकारांचे फोन टॅप केले जात आहेत. केंद्र सरकार हे लोकशाहीचा खून करत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी नाना पटोले आणि इतर काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली.

निलंबित 12 आमदार सर्वोच्च न्यायालयात जाऊन काहीही होणार नाही

भारतीय जनता पक्षाच्या ज्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आल्याच्या प्रकरणाला पुन्हा एकदा नाना पटोले यांनी समर्थन दिले. या बाराही आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केली. विधानसभेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला होता. लोकशाहीला काळिमा फासणारी अशी घटना होती. म्हणूनच या आमदारांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळेच हे बारा आमदार जरी सर्वोच्च न्यायालयात जात मागायला गेले असले तरी, याबाबतचे सर्व अधिकार विधिमंडळाला आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाऊनही निलंबित बारा आमदारांच्या पदरी काहीही पडणार नाही, असा चिमटा नाना पटोले यांनी काढला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details