मुंबई - सुशातसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून बॉलिवूडचे अमलीपदार्थ तस्करांशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आता पीए मोदी चित्रपटाचा निर्माता संदिप सिंह याचीही सीबीआय चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यातच आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी संदिप सिंहचे भाजपशी जवळचे संबध असल्याचा दावा करणारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे. याच बरोबर सावंत यांनी संदीप सिंह आणि भाजपाशी नेमके कोणते जवळीकतेचे संबंध होते, याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
सुशांत प्रकरण : काँग्रेसचा पलटवार; 'हा' फोटो ट्विट करत भाजपला पकडले कोंडीत - सचिन सावंत यांचे ट्विट
बॉलिवूडमधल्या दिग्गजांशी जवळचे संबंध असल्यामुळंचे आधीच्या फडणवीस सरकारनं बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीचे आदेश दिले नव्हते का? सीबीआय व ईडीला सुशांत प्रकरणात सहभागी करून घेण्यामागे संदीप सिंह हेच कारण आहे का? या प्रश्नाची सीबीआय चौकशी करायला हवी अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या टि्वटद्वारे केली आहे.

सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये त्यांनी संदीप सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचे पोस्टर आणि त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमाला त्या भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. असे सांगत अप्रत्यक्षरीत्या भाजप आणि संदीप सिंह यांच्या माध्यमातून यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच भाजपचे नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभेत बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनवर चर्चेची मागणी केली होती. 'ड्रग्स आणि बॉलिवूड' बद्दल वादविवाद आहेत, त्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ड्रग्ज नेक्ससच्या खुलासा होण्यासाठी चौकशी करावी असेही कदम पत्रात म्हणाले होते. याचाच धागा पकडून सचिन सावंत यांनी भाजपची कोंडी केली आहे.
राम कदम यांच्या मतानुसार बॉलीवूड आणि ड्रग्स माफियांचे संबध असतील तर मग, बॉलिवूडमधल्या दिग्गजांशी जवळचे संबंध असल्यामुळंचे आधीच्या फडणवीस सरकारनं बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीचे आदेश दिले नव्हते का? सीबीआय व ईडीला सुशांत प्रकरणात सहभागी करून घेण्यामागे संदीप सिंह हेच कारण आहे का? या प्रश्नाची सीबीआय चौकशी करायला हवी अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या टि्वटद्वारे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पी एम नरेंद्र मोदी या बायोपिकच्या पोस्टरचे त्यावेळी 27 भाषांमध्ये उद्घाटन झाले होते. त्यावेळी फडणवीस यांची उपस्थिती कशी लावली होती. यासाठीचे फोटो सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये शेअर केले आहेत. संदीप सिंह आणि भाजपाचे अत्यंत जवळचे आहेत. यामुळे भाजपाच्या संबंधांचा अँगलसुद्धा तितकाच महत्त्वाचा असल्याचे सावंत यांनी सांगितले.