महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Congress Criticizes MNS : 'आधी बाबासाहेब वाचा मग तुमचे भोंगे बंद होतील'; काँग्रेसची मनसेवर टीका - राजू वाघमारे मराठी बातमी

तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना उघडा ती वाचा म्हणजे तुम्हाला देश कळेल आणि एकदा देश कळला की हे भोंगे आपोआप बंद होतील, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मनसेवर केली ( Congress Criticizes MNS ) आहे.

raju waghmare
raju waghmare

By

Published : Apr 14, 2022, 8:24 PM IST

मुंबई -"राज्यात सध्या जे काही भोंगे वाजत आहेत, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचले पाहिजेत. त्यांनी ते समजून घेणे गरजेचे आहे. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना उघडा ती वाचा म्हणजे तुम्हाला देश कळेल आणि एकदा देश कळला की हे भोंगे आपोआप बंद होतील," अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मनसेवर केली ( Congress Criticizes MNS ) आहे.

तर ते लोक इथं कशाला येतील ? -ते आज दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राजू वाघमारे म्हणाले की, "राज ठाकरे शिवाजी पार्कलाच अगदी हाकेच्या अंतरावर राहतात. मात्र, तरीसुद्धा ते इथे चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या घटनेवरील प्रेमावर, त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम आहे की, नाही याच्यावर आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. इतक्या जवळ राहून त्यांनी चैत्यभूमीवर येणे अपेक्षित आहे. पण बाबासाहेबांचे विचार भाजपासोबत जाणाऱ्या बी आणि सी ला समजत नसतील तर ते लोकं इथे कशाला येतील?," असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला.

राजू वाघमारे प्रसारमाध्यमांशी बोलताना



ती लोकं भोंग्यांवर राजकारण करणार नाहीत -"ज्या लोकांना बाबासाहेब समजले, ज्या लोकांना घटना समजली त्यांनाच देश समजला आणि ज्यांना देश समजला अशी कुठलीही लोक, कुठलाही पक्ष भोंगे, हनुमान चालीसा, आरत्या यांना घेऊन लोकांची दिशाभूल करणार नाहीत राजकारण करणार नाहीत," असा टोलाही राजू वाघमारे यांनी मनसेला लगावला आहे.

हेही वाचा -Chitra Wagh Notice : चित्रा वाघांच्या अडचणीत वाढ; रघुनाथ कुचिकांनी पाठवली 10 कोटींची नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details