मुंबई- पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत जे घडले, त्याचा आम्ही निषेध करतो. पंतप्रधानाच्या पदाला एक गरिमा आहे. मात्र त्या पदाची गरिमा घालवण्याचा काम भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. त्यामुळे याच्या विरोधात आम्ही बोलणारच आहोत, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( congress reaction on pm modi security breach ) यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on PM Security Breach ) म्हणाले, की पंतप्रधान यांचा कार्यक्रम निश्चित असतो. शेवटच्या क्षणी तो कार्यक्रम बदलण्याचे काम कोणी केले? याबाबत आम्ही प्रश्न विचारणारच... त्यासाठी माझ्यावर कितीही पोलिसात तक्रारी झाल्या तरी, चालतील. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये जे घडले, त्याला जबाबदार केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आहे. पंतप्रधान जात असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पोहोचलेच कसे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा उपस्थित केला. याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "जे पेरले, तेच उगवलं" असे म्हणत नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ( Nana Patole Slammed PM over Security Breach ) टीका केली होती.
हेही वाचा-President meets PM : राष्ट्रपतींनी घेतली पंतप्रधानांची भेट; सुरक्षेतील त्रुटीवर केली चिंता व्यक्त