मुंबई :वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीवर काँग्रेसकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या गर्दीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे चौकशी झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.
गर्दी झालीच कशी याची चौकशी व्हायला हवी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं या घटनेवर लक्ष आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही बाळासाहेब थोरात म्हणाले. महाविकास आघाडीतील मंत्रीच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत असतील, तर जनतेसमोर काय संदेश जाईल? म्हणून मुख्यमंत्र्यांनी लवकर यासंदर्भात पावले उचलण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच प्रतिबंधात्मक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीचे आवाहन सामान्य जनतेला केले आहे. तसेच राजकीय नेते मंडळींनीही आपल्या सभा, बैठका काही दिवस घेऊ नये असेही आवाहन केले. त्यामुळे मंत्री संजय राठोड पोहरादेवी येथे दर्शनासाठी गेल्यावर एवढी मोठी गर्दी नेमकी कशी झाली याची चौकशी होणे गरजेचं असल्याचं असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आपण कुणालाही मंदिर परिसरात बोलाविले नसून नागरिक स्वतःहून तिथे आल्याचं स्पष्टीकरण संजय राठोड यांनी दिलं आहे.
शरद पवार-मुख्यमंत्री भेटीत चर्चा?