मुंबई : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमधील काँग्रेसच्या अपयशाचं विश्लेषण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत ही समिती आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करणार आहे.
पाच राज्यांच्या विधानसभेतील पराभवाच्या विश्लेषणासाठी अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात काँग्रेसची समिती - ashok chavan
देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयशाचा सामना करावा लागाला. काँग्रेसच्या निवडणुकीतील सातत्यपूर्ण अपयशाचे कारण शोधण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार केली आहे.
निवडणुकांतील अपयशाचे विश्लेषण करणार
देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयशाचा सामना करावा लागाला. काँग्रेसच्या निवडणुकीतील सातत्यपूर्ण अपयशाचे कारण शोधण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक समिती तयार केली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव के सी वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली. ही समिती येत्या पंधरा दिवसांत निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करून याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार आहे.
ज्येष्ठ नेत्यांचा समितीत समावेश
या समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खासदार ज्योती मणी हे चार सदस्य असतील. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसच्या पदरी अपयश आलं. त्यामुळे सातत्याने काँग्रेसला निवडणुकांमध्ये अपयशाला का सामोरं जावं लागतंय. याचं विवेचन या समितीकडून करण्यात येणार आहे. या समितीचा रिपोर्ट पंधरा दिवसांत हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिला जाणार आहे.