मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस उरले आहेत. सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत संजय निरुपम, प्रिया दत्त आणि उर्मिला मातोंडकर यांनी बांद्रा जिल्हाधिकारी इथे अर्ज भरला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यलयासमोर १०० मीटरच्या आतच मोदी चोर है, काँग्रेस जिंदाबाद, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती.
काँग्रेसच्या निरुपम, प्रिया दत्त यांच्यासह उर्मिला मातोंडकर यांनी शक्तिप्रदर्शन करत भरले नामांकन अर्ज - loksabha
सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत संजय निरुपम, प्रिया दत्त आणि उर्मिला मातोंडकर यांनी बांद्रा जिल्हाधिकारी इथे अर्ज भरला.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या उर्मिला मातोंडकर
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण या मतदारसंघात येत्या २९ एप्रिलला मतदान होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार ९ एप्रिल आहे.