मुंबईवेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर चहुबाजूनी विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची जोड उठवली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शिंदे सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल Congress Balasaheb Thorat Critisize केला आहे. स्पर्धेत नसलेल्या गुजरातला हा प्रकल्प देऊन राज्य सरकार Eknath Shinde Govt गुजरात सरकारचं मन सांभाळत आहे. मात्र महाराष्ट्रातील तरुणांचे यामुळे मोठे नुकसान होणार आहे, असा घणाघात बाळासाहेब थोरात Congress leader Balasaheb Thorat यांनी केला आहे.
कंपनीला कोणताही प्रतिसाद नव्हता महाविकास आघाडी सरकारमुळे वेदांत सारखा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. या आरोपाचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी खंडन केले. वेदांता सारखा प्रकल्प जाणे, Vedanta Project Gone Gujarat अत्यंत दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्रासाठी आहे. महाविकास आघाडीमुळे प्रकल्प गेला, असा आरोप करणाऱ्यांनी मागील तीन महिन्यात कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. शिवाय, महाराष्ट्रात प्रकल्प यावा, याकरिता संबंधित उद्योग कंपनीला कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. तसेच या स्पर्धेमध्ये तीन राज्य होती. यामध्ये गुजरात राज्य नव्हते आणि अशावेळी गुजरातला प्रकल्प जाणे, हे गुजराती सरकारचे मन सांभाळण्यासाठी आपले राज्य सरकार काम करत आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात Congress leader Balasaheb Thorat यांनी केली आहे.