मुंबई - पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसकडून विधानभवाबाहेर सायकल रॅली काढली. मात्र, राज्यात असणाऱ्या अनेक प्रश्नांवर न बोलता, महाविकास आघाडीतले हे काँग्रेस पक्ष इंधन दरवाढीवर आंदोलन करत आहे हे चुकीचे आहे म्हणत, भाजप नेत्यानी विधान भवनाबाहेर काँग्रेस नेत्यांचा विरोधात घोषणा दिल्या. एकीकडे काँग्रेस नेते घोषणा देत होते, दुसरीकडे भाजप नेते घोषणाबाजी करत होते.
अधिवेशन सुरू होण्या आधीच काँग्रेस आणि भाजप नेते भिडले - news about Congress and BJP leaders
अधिवेशन सुरू होण्याआधीच काँग्रेस आणि भाजप नेत एकमेकांना भिडल्याचे दिसले. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सभागृहाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेसचे सर्व मंत्री आणि आमदारांनी सायकलवरून विधानभवन गाठत पेट्रेल डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवला. यावेळी केंद्र सरकार विरोधात विधानसभवनात घोषणाबाजीही करण्यात आली. भाजप नेते देखील आक्रमक होत, राज्यात असलेल्या अनेक प्रश्नांवर तुम्ही का बोलत नाही म्हणून महाविकास आघाडी विरोधात घोषणा दिल्या.गेट बाहेर सायकल रॅली करत आलेले काँग्रेस नेते एकीकडे होते , तर दुसरीकडे विधानभवनाच्या गेटवर भाजप नेते घोषणा देत एकमेकांना भिडले.
राज्यात अनेक मुद्य्यांवर हे अधिवेशन गाजनार आहे. महाविकास आघाडी सरकारला विरोधक भाजप अनेक मुद्य्यांवर कोंडीत पकडणार आहे. त्यात शेतकरी प्रश्न, मराठा आरक्षण, कोविड परिस्थिती, वीज बिल, बदल्या आणि महिला सुरक्षा असे अनेक समस्यांवर सरकारला भाजप कोंडीत पकडणार आहे. त्यामुळे भाजप महाविकास आघाडीला भारी पडू नये यासाठी महाविकास आघाडी सरकारचे केंद्रातील भाजप विरोधात आंदोलन करून राज्यातील भाजप नेत्यांना थोपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस त्यातच विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात धुमशानाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.