मुंबई -केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत असून, महागाई प्रचंड वाढल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याविरोधात आज काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात मुंबईत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी