महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपविरोधात काँग्रेसचे चेंबूर येथे आंदोलन - congress agitation against bjp government

देशातील सध्याची बेरोजगारी, अर्थव्यवस्था आणि पीएमसी बँक घोटाळा आणि नोटबंदीला झालेले 3 वर्ष याबाबत काँग्रेस पक्षाने देशभर भाजप सरकारच्याविरोधात निर्दशने केले. याचाच भाग म्हणून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर येथे आंदोलन करण्यात आले.

भाजपविरोधात काँग्रेसचे चेंबूर येथे आंदोलन

By

Published : Nov 9, 2019, 3:17 PM IST

मुंबई- देशात उद्भवलेली आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी, भाववाढ, बँकांची ढासळत चाललेली आर्थिक स्थिती, कृषी संकट, शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती या परिस्थितीला जबाबदार असलेल्या भाजप सरकारविरोधात दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेसच्यावतीने चेंबूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली .

भाजपविरोधात काँग्रेसचे चेंबूर येथे आंदोलन

हेही वाचा -पहेले मंदिर फिर सरकार; उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील - खासदार राहुल शेवाळे

देशातील सध्याची बेरोजगारी, अर्थव्यवस्था आणि पीएमसी बँक घोटाळा आणि नोटबंदीला झालेले 3 वर्ष याबाबत काँग्रेस पक्षाने देशभर भाजप सरकारच्याविरोधात निर्दशने केले. याचाच भाग म्हणून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी एकनाथ गायकवाड यांनी नोटबंदी करून काय मिळाले, ते जनतेला न दाखवता मोदी सरकारने काळा पैसा पांढरा करण्याकरता नोटाबंदी केली असून तीन वर्षांपूर्वी या नोटाबंदीमुळे जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहतो, हा देश सामान्य नागरिकांना तारू शकत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

काळाबाजार संपला पाहिजे, दहशतवाद संपला पाहिजे, आजही देशात अराजकता माजत आहे. देशाबाहेर असलेला काळा पैसा आला नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांना मदत करण्यास भाजप सरकारकडे पैसे नाहीत, असे माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी यावेळी सांगितले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details