महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मोदी हाय हायच्या घोषणा; कर्नाटक घटनेचा केला निषेध - काँग्रेस कार्यकर्ते

आमदारांना मुंबई येथील सोफिटेल हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आज या हॉटेलच्या बाहेर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी हाय हायच्या घोषणा देत या घटनेचा निषेध केला.

काँग्रेस कार्यकर्ते

By

Published : Jul 7, 2019, 6:22 PM IST

मुंबई - कर्नाटकमधील जेडीयू आणि काँग्रेसच्या ११ आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला. या आमदारांना मुंबई येथील सोफिटेल हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या आमदारांना ब्लॅकमेल करुन येथे आणले आहे, असा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला. त्यामुळे आज या हॉटेलच्या बाहेर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी हाय हायच्या घोषणा देत या घटनेचा निषेध केला. निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काँग्रेस कार्यकर्ते

मुंबईत आज राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. कर्नाटकातील १० आमदारांना भेटण्यासाठी सकाळपासूनच भाजप नेते येत आहेत यात प्रसाद लाड असतील मोहित कंबोज असतील यांनी यावेळी हजेरी लावली हे सर्व नेते या आमदारांना विकत घेण्यासाठी झाले आहेत असा आरोप देखील यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. एकीकडे 11 आमदारांचा राजीनामा दुसरीकडे मिलिंद देवरा यांचा राजीनामा यामुळे काँग्रेसची अडचण वाढताना दिसत आहे

ABOUT THE AUTHOR

...view details