मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत भाषण करताना काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याची टीका केली. त्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर आज राज्यात काँग्रेसचे आंदोलन सुरू ( Congress Protest Against PM Modi ) आहे. मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याची जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केली. महाराष्ट्रात या विधानाचे तीव्र पडसाद उमटले असून काँग्रेसने राज्यभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. मुंबईत मंत्रालय समोरील गांधी पुतळ्यासमोर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या जनतेचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी करत भाजप आणि मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप नेते, खासदार, आमदार, केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर भाजपाला महाराष्ट्रदेशी ठरवून काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
जोरदार घोषणाबाजी
'नहीं चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी', 'मोदी सरकार शरम करो', 'नरेंद्र मोदी शरम करो', 'तानाशाही नही चलेगी', अशा शब्दात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, नितीन राऊत आदी काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन
कोरोना काळात केंद्र सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले होते. या संकटाच्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने लोकांना मदत केली. अचानक लाभल्याने घरात अडकून पडलेल्या परराज्यातील लोकांना राशन, जेवण, औषध व जीवनावश्यक वस्तू पुरवल्यानंतर आपल्या राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या मुंबईसह राज्यातील लाखो लोकांना काँग्रेस पक्षाने त्यांच्या राज्यात जाण्याची सोय उपलब्ध करून दिली. केंद्र सरकार मदतीला धावले नाही, पण काँग्रेस पक्ष त्यांच्या मदतीला धावला. परंतु संसदेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस व आरोप करताना उत्तर भारतीय लोकांना कोरोना स्पेडर ठरवून त्यांचा अपमान केला आहे. तसेच मदत करणाऱ्या महाराष्ट्राचाही अवमानकारक उल्लेख केला. मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा वापर करणारे भाजप खासदार राज्याचा अपमान होत असताना, खासदार संसदेत टाळ्या वाजवत होते, असा आरोप नाना पटोले यांनी केला. तसेच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान काँग्रेस कदापि सहन करणार नाही, असा इशारा दिला. तर जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा माफी मागत नाही तोपर्यंत यांच्याविरोधात आंदोलन करत राहू असे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.
उत्तर प्रदेशच्या जनतेचा हा अपमान
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोदींच्या विधानाचा यावेळी खरपूस समाचार घेतला. कामगार मजुरांना करून फसवणारी म्हणून पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे उत्तर प्रदेशने मोदींचे भाजपचा 97 खासदारांनी निवडून दिले त्याच उत्तर प्रदेशच्या जनतेचा हा अपमान आहे. मुंबईसह राज्यात पर राज्यातून लाखो लोक कामासाठी येतात पण आम्हाला नेहमीच साथ दिली आहे. संकट काळात मदतीला धावून जाणे ही कॉंग्रेसची परंपरा आहे. त्याच भावनेतून काँग्रेसने मदत केली, असे वडेट्टीवार म्हणाले. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर देशाच्या सीमा सील करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिली असताना नमस्ते ट्रम्पसाठी मोदींनी देशाला वेठीस धरले. मोदींच्या नाकर्तेपणामुळे देशात कोरोना वाढला आणि त्याचे खापर आज ते दुसऱ्यावर फोडत असल्याचा आरोप करताना पंतप्रधानांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, आणि माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
यावरून झाला वाद
कोरोना वैश्विक महामारी आहे, आज भारत सुमारे 100 टक्के नागरिकांना पहिला डोस तर 80 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्याचे काम पुर्ण करत आहोत पण त्यातही राजकारण केले गेले. कोरोना काळात काॅंगेसने तर हद्द केली, मुंबईतील गर्दी कमी व्हावी यासाठी त्यांना आपआपल्या राज्यात पाठवले आणि बिहार-उत्तर प्रदेशसह देशभरात कोरोना पसरवला. सगळीकडे आफरातफरी पसरवली. दिल्ली सरकारने तर गल्ली बोळात भोंगे फिरवुन लोकांना वापस पाठवले आणि कोरोना पसरवला. कोरोना मोदीच्या प्रतिमेला धक्का बसवेल यासाठी वाट पाहत होते, अशी टीका पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका केली होती.