महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कुलाबा मतदारसंघासाठी भाई जगतापांनी भरला उमेदवारी अर्ज - assembly election news

काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी आज (मंगळवार) उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ढोल ताशा वाजवत व शक्तिप्रदर्शन करत भाई जगताप यांनी हजारो कार्यकर्ते घेऊन मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात आपला निवडणूक अर्ज भरलेला आहे.

मुंबई

By

Published : Oct 1, 2019, 2:25 PM IST

मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी कुलाबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी आज (मंगळवार) उमेदवारी अर्ज भरलेला आहे. ढोल ताशा वाजवत व शक्तिप्रदर्शन करत भाई जगताप यांनी हजारो कार्यकर्ते घेऊन मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात आपला निवडणूक अर्ज भरलेला आहे.

कुलाबा मतदारसंघासाठी भाई जगतापांनी भरला उमेदवारी अर्ज

हेही वाचा - युतीच्या नेत्यांना 'या' गोष्टीची वाटतेय भिती?...म्हणूनच दडवला जातोय जागा वाटपाचा फॉर्म्युला!

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना गेल्या शुक्रवारी जारी करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी राज्यातील २८८ मतदारसंघापैकी पहिल्या दिवशी १४ मतदारसंघात १४ उमेदवारांनी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मुंबईत दिली होती. त्यात आज तिसऱ्या दिवशी देखील मुंबईत काँग्रेस व वंचित पक्षाच्या काही उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यात भाई जगताप यांचा मुंबईतून कॉंग्रेसमधला पहिला उमेदवारी अर्ज आहे.

हेही वाचा - मुख्यंमत्री फडणवीस यांना 'सर्वोच्च' झटका, प्रलंबित गुन्ह्यांची माहिती प्रकरणी खटला पुन्हा चालणार

गेल्या शनिवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला होता. तथापि, निवडणूक आयोगाने निवडणुकीची अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरणाऱ्यांना उमदेवारी अर्ज भरता येणार आहे. ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवार अर्ज भरु शकणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details